Jalgaon train accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon train accident : ८ पुरुष, ३ महिला, १ बालक, पुष्पक एक्स्प्रेस अपघातात १२ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Pushpak Express tragedy : जळगावच्या परधाडेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांनी प्राण गमावले. त्यात ८ पुरुष, ३ महिला आणि १ लहान बालकाचा समावेश आहे.

Vishal Gangurde

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव : जळगावमध्ये पुष्पक एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक एक्स्प्रेसने काही प्रवाशांना उडवलं. त्यात ८ पुरुष, ३ महिला, १ बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगावच्या परधाडेजवळ झालेल्या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहेत. या अपघातात मृत पावलेले बहुतांश व्यक्ती नेपाळ आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. या १२ जणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जळगावजवळील परधाडे येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेश, नेपाळ आणि मुंबईतील एका महिलेचा समावेश आहे. पुष्पक रेल्वेमधील प्रवाशांमध्ये आगीची अफवा पसरली. त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेची साखळी ओढळी. त्यानंतर प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. पुढे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना उडवलं. या अपघातात एकूण १२ प्रवाशांचा मृत्यू झाला.

मृतांची नावे आली समोर

कमला नवीन भंडारी (४३) कुलाबा

लच्छीराम पासी (४०) नेपाळ

हिनू नंदराम विश्वकर्मा (११) नेपाळ

बाबु खान (२७) उत्तर प्रदेश

इम्तियाज अली (३५) उत्तर प्रदेश

नसरुद्दीन बहुद्दीन सिद्दिकी (१९) उत्तर प्रदेश

जवकला भटे जयकडी (८०) नेपाळ

अन्य दोघांची ओळख पटली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT