Baby dies after injection Saam TV News
महाराष्ट्र

बाळाला चालता येईना, व्याजाने पैसे काढून महागडं इंजेक्शन दिलं, चिमुकला दगावला; आई-बापाचा आक्रोश

Jalgaon Crime News : दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील एका खासगी रूग्णालयामध्ये जावळे डॉक्टरांकडे तीन वर्षाच्या चिमुकल्याला ऍडमिट करण्यात आले. मुलाला कोणताही आजार नव्हता.

Prashant Patil

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून अनेक रूग्णालयांचे मुजोरीचे प्रकार पुढे येत आहेत. १० लाख रूपये भरले नसल्यानं पुण्यात तनिषा भिसे यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. आता जळगावातील एक अतिशय धक्कादायक घटना पुढे आली आहे. रूग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केलाय. मुलाच्या उपचारासाठी वडिलांनी व्याजाने पैशांची जुळवाजुळव केली. मात्र, डॉक्टरांनी थेट मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जातेय. हर्षल थाडे असं या चिमुकल्याचं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील एका खासगी रूग्णालयामध्ये जावळे डॉक्टरांकडे तीन वर्षाच्या चिमुकल्याला ऍडमिट करण्यात आले. मुलाला कोणताही आजार नव्हता. त्याला फक्त चालता येत नसल्याने आई-वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुण्यावरून आलेल्या डॉक्टरांकडून ५० हजारांचं इंजेक्शन दिलं आणि थेट त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये वडिलांच्या सह्या घेऊन मुलाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नाही.

आम्ही मोलमजुरी करून त्या डॉक्टरांना व्याजाने पैसे काढून ५० हजार रुपये जमा केले. अगोदर आम्हाला ८० हजारांचं इंजेक्शन असल्याचं सांगितलं. त्यानंतर ३० हजार रुपये कमी करून १५००० घेतले त्यानंतर ३० हजार अजून जमा केले, असं कुटुंबियांनी सांगितलं. संबंधित पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र, तिथे त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. जोपर्यंत डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तीन वर्षाच्या लेकराचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं पालकांनी सांगितलं.

हर्षलला चालण्यास समस्या येत असल्याने त्याला रूग्णालयात नेण्यात आलं आणि त्याला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. बाळाचा शवविच्छेदन करून बाळाच्या पालकांच्या सह्या देखील घेण्यात आल्या. मात्र, मृतदेह ताब्यात न देता डॉक्टर कर्मचारी शवविच्छेदन विभागाला कुलूप लावून घरी गेले. डॉक्टर जावळे यांनी या उपचाराची जबाबदारी घेतली होती, असं पालकांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT