Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : थंड पाणी भरताना वॉटर कुलरमधून विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : पाच ते सहा वर्षांपूर्वी त्याचे आई, वडील, भाऊ येथे उदरनिर्वाहासाठी आले होते. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता

Rajesh Sonwane

रावेर (जळगाव) : सध्या जळगाव जिल्ह्यातील तापमान ४३ अंशाच्या वर पोहचले असल्याने अगदी सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. यामुळे थोडा दिलासा म्हणून कुलरचा वापर केला जात आहे. शिवाय थंड पाणीचा आधार घेतला जात आहे. दरम्यान दुपारी पिण्यासाठी थंड पाणी घेत असताना वॉटर कुलरला हात लावताच विजेचा जोरदार झटका बसला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १९ मी रोजी दुपारी घडली. 

धृपकुमार चरनसिंग कुशवाह (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून तो  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सुजालपुरा (ता. लहार, जि. भिंड) येथील मूळ रहिवाशी असून रावेरमधील श्रीकृष्णनगरात वास्तव्यास होता. बऱ्हाणपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पाणीपुरीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी दुपारी चारच्या सुमारास धृपकुमार व्यवसायासाठी पेट्रोल पंपावरील वॉटर कुलरचे थंड पाणी आणण्यासाठी गेला होता. वॉटर कुलर सुरू करताना त्याला शॉक (Electric Shock) लागून तो खाली कोसळला. 

वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह 

यानंतर त्याचा भाऊ शिवम याच्यासह काही नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पाच ते सहा वर्षांपूर्वी त्याचे आई, वडील, भाऊ येथे उदरनिर्वाहासाठी आले होते. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. याबाबत भाऊ शिवम कुशवाह याने दिलेल्या माहितीवरून (Raver) रावेर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक इस्माईल शेख तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना भेटायला प्रफुल्ल पटेल ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

Cooking Tips : चपात्या तासनतास मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

नगरसेवकपद देतानाच ६ जणांकडून घेतले राजीनामे; नाशिक महापालिकेत भाजपचा अजब फॉर्म्युला

Vastu Tips for Dining : घरात 'या' 5 ठिकाणी बसून जेवण करणे टाळा; अन्यथा घरात येऊ शकते नकारात्मक ऊर्जा!

लाडक्या बहिणींना मिळणार 3000? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

SCROLL FOR NEXT