Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : सुट्टीत मामाच्या घरी आली, रात्री सर्वांसोबत जेवण केले; पहाटे भाचीला पाहून मामाला बसला धक्का

Jalgaon News : नाशिक येथील मराठा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत होती. बारावीची परीक्षा संपल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून ती भोंडण येथील रहिवासी मामा सतीश सुखदेव सोनवणे यांच्याकडे सुटी घालविण्यासाठी आली

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : बारावीची परीक्षा देऊन सुटी घालविण्यासाठी मामाच्या गावाला राहण्यासाठी आली. मागील काही दिवसांपासून राहत असलेली तरुणी रात्री सर्वांसोबत जेवली. यानंतर सर्वजण झोपल्यानंतर तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पारोळा तालुक्यातील भोंडण येथे घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सदर तरुणीने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

पायल संतोष शिंदे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पायल ही नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे वास्तव्यास होती. तर नाशिक येथील मराठा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत होती. बारावीची परीक्षा संपल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून ती भोंडण येथील रहिवासी मामा सतीश सुखदेव सोनवणे यांच्याकडे सुटी घालविण्यासाठी आली होती. याठिकाणी आल्यानंतर पायल हि सर्वांसोबत आनंदात होती. 

गप्पा मारल्यानंतर सर्वजण झोपले 

दरम्यान २७ मार्च रात्रीच्या सर्वानी एकत्र जेवण केले. यावेळी पायल देखील होती. तिने सर्वांसोबत गप्पा मारल्या. यानंतर सर्वानी झोपण्याची तयारी केली. पायल देखील नेहमी झोपायची त्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. मात्र सर्वजण झोपल्याचे पाहून पायलने मध्यरात्रीनंतर घरातील लोखंडी छताला खाटच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

भाचीला पाहून मामाला बसला धक्का  

दरम्यान पहाटे चार वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या मामाला पायल हिने गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आली. मामा सतीश यांनी घडला प्रकार पाहून घरच्या मंडळींना देखील उठविले. यानंतर त्यांनी तरुणीला खाली उतरवून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून तीस मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र तिने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण समजलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Deleted Messages: व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट झालेले मेसेज वाचायचे आहेत? फक्त 'हे' स्टेप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Ajit Pawar News : काही लोक विकृत असतात, अजित पवारांनी आमदार सोनवणेंना सुनावले

Maharashtra Politics: मद्य घोटाळ्याचा आर्थिक कणा शिंदेंच्या फाउंडेशनचा! संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा – संजय राऊत|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार? ३००० रुपये या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT