Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी २५ हजाराची मागणी; महिला तलाठी एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी तलाठी वर्षा काकूस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये जमा करून घेतले

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी २५ हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी महिला तलाठीस लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी आज ताब्यात घेतले आहे. डिसेम्बर २०२३ मध्ये लाचेची मागणी केल्यानंतर त्याची संपूर्ण पडताळणी करत एसीबीने तलाठीस दोषी मानत आज ताब्यात घेतले आहे. 

पारोळा (Parola) तालुक्यातील मौजे शिवरे दिगर येथील रहिवाशी तक्रारदाराचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असते. यामुळे मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी तलाठी वर्षा काकूस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये जमा करून घेतले. त्यानंतर तक्रारदाराने गौण खनिज परवानाची चौकशी करण्यासाठी तलाठी वर्षा काकुस्ते यांची १२ डिसेंबर २०२३ ला भेट घेतली. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी दिलेल्या पैशाची पावती न देता त्या व्यतिरिक्त २५ हजाराची मागणी केली होती. (bribe) दरम्यान सदर तक्रारीची १३ डिसेंबरला पडताळणी केली. 

पडताळणी दरम्यान तलाठी वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याच दिवशी पुन्हा पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करत सदर रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. चौकशीअंती यात सातत्य आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला तलाठीस ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई (Dhule ACB) धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील ,सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT