Parola Crime Saam tv
महाराष्ट्र

Parola Crime : दागिन्यांसाठी महिलेची हत्या; संशयिताला धुळे जिल्ह्यातून अटक

Jalgaon News : क्यावर व तोंडावर दगडाने वार करून गळा आवळून जीवे ठार मारत शोभा कोळी यांचा चेहरा प्लास्टिक गोणीत झाकून झुडपामध्ये टाकण्यात आला होता. घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह काटेरी झुडपात फेकून देण्यात आल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून सोन्याच्या दागिन्यांसाठी सदर महिलेची हत्या करण्यात आल्याची कबुली सदर संशयिताने दिली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

जळगावच्या पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील रहिवासी शोभा रघुनाथ कोळी (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अनिल गोविंदा संदानशिव (वय ४५) आहे. दरम्यान डोक्यावर व तोंडावर दगडाने वार करून गळा आवळून जीवे ठार मारत शोभा कोळी यांचा चेहरा प्लास्टिक गोणीत झाकून झुडपामध्ये टाकण्यात आला होता. घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली होती. 

या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने महिलेच्या मोबाईलच्या सीडीआरवरून सुमठाणे येथील संशयित अनिल संदानशिव हा शोभा कोळी सोबत असल्याची माहिती मिळाली. पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गावात अनिलचा शोध घेतला असता तो फरार झाला होता. मात्र २८ जूनला रात्री दहाला धुळे जिल्ह्यातून त्यास ताब्यात घेतले. 


दागिन्यांसाठी केली हत्या 
दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता अनिल याने खून केल्याची कबुली दिली. तर शोभा पारोळा शहरात धुणीभांडी करून तिने सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र, संशयित अनिलने गैरफायदा घेत महिलेशी ओळखी करीत तिला विश्वासात घेतले. सुमठाणे गावाजवळील वन विभागाच्या राखीव जंगलात नेऊन या दागिन्यांसाठी अनिलने तिचा खून केल्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT