Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : वास्तुशांतीसाठी जवान रजा घेऊन आला, वडिलांच्या मदतीला गेले अन् काळाने घाला घातला

संजय महाजन

पाचोरा (जळगाव) : गावी नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रम नियोजित होता. यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान भूषण बोरसे सुटीवर आले होते. मात्र शेतात गेलेल्या वडिलांना मदतीसाठी शेतात गेले असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गाव शिवारात घडली. 

पाचोरा (Pachora) तालुक्यातील अंतुर्ली खडकी येथील सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. भुषण बोरसे हे बिहार येथील मोतीहारी ७टि १बीएन बटालीय मध्ये सशस्त्र सिमा बलमध्ये कार्यरत होते. दरम्यान पाचोरा शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरात त्यांनि घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम नियोजित केला होता. यासाठी ते रजा घेऊन घरी आले होते. या दरम्यान ते दिवसभर परीवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपल्या गावी आले.  

याच वेळी अचानक पावसाची रीमझीम सुरू झाली. तेव्हा हातातील घड्याळ आणि मोबाईल विजेपासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवले. यानंतर ते दुचाकीने शेतात गेलेल्या वडीलांना मदतीसाठी धाव घेतली. याच वेळी (Lightning Strike) विजेचा कडकडाट होत असताना वीज कोसळून वडीलांच्या अवघ्या १०० फुटांवर भुषण बोरसे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची वार्ता तालुक्यात पसरल्याने शोककळा पसरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alia Bhatt : अगं बाई किती गोड! 'नाटू नाटू' गाण्यावर थिरकते आलियाची लेक

Central HomeMinister Amit Shaha : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन

Jalna News : तलवारीने केक कापणे पडले महागात; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

Dussehra Rangoli : दसऱ्यानिमित्त अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुबक रांगोळी

Maharashtra News Live Updates: भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची तब्येत खालावली, उपचारासाठी मुंबईकडे रवाना

SCROLL FOR NEXT