Jalgaon zp 
महाराष्ट्र

सीईओंचा १६ कलमी कार्यक्रम; जळगाव जिल्‍हा परिषद शाळांचे रूप पालटणार

सीईओंचा १६ कलमी कार्यक्रम; जळगाव जिल्‍हा परिषद शाळांचे रूप पालटणार

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्‍हा परिषद शाळा खासगी शाळांच्‍या तुलनेत मागे राहू नये; यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत. आताच्‍या कोरोना प्रादुर्भावात शाळा बंद असल्‍या तरी जिल्‍हा परिषद शाळा कोणत्‍याही परिस्‍थीतीत मागे रहायला नको. याकरीता शाळांचे रूप पालटण्यासाठी जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १६ कलमी कार्यक्रम आखला आहे. (jalgaon-news-zilha-parishad-school-ceo-pankaj-aashiya-program-in-school-devolopment)

शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सर्व सुविधा तसेच शाळांचा विकास साधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १६ कलमी कार्यक्रम हातात घेतला आहे. यात १६ विशिष्ट बाबींची शाळांकडून आठवड्याभरात माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती गोळा झाल्यानंतर यावर काम होणार आहे. त्यात पंधराव्या वित्त आयोगातून शाळांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

शुक्रवारपर्यंत माहिती मागविली

सीईओ डॉ. आशिया यांनी आखलेल्‍या कार्यक्रमानुसार शाळांकडून येत्या शुक्रवारपर्यंत माहिती मागविण्यात आली आहे. यात शाळांचे रुप पालटण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच त्यांना उत्तम वातावरणात चांगले शिक्षण मिळावे यावर भर दिला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी सांगितले.

अशा आहेत १६ बाबी

हॅण्डवॉश स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टींग, ग्रंथालय, किचन गार्डन, इंटरनेट, संगणक, लॅपटॉप, वर्ग खोल्या दुरूस्ती, विद्युतीकरण, वृक्षलागवड, बायोमॅट्रीक प्रणाली, सोलर लाईट, शैक्षणिक सॅाफ्टवेअर, शाळांना वॉल पेंटीग या बाबी कुठल्या शाळेत आहेत व कुठे नाहीत याची माहिती मागविण्यात आली आहे. यानुसार पुढील महिन्यांपासून यावर काम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT