Jalgoan zp Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: पदाधिकाऱ्यांची मुदत संपली अन्‌ ५२ कोटी कामांची स्‍थगितीही उठली

पदाधिकाऱ्यांची मुदत संपली अन्‌ ५२ कोटी कामांची स्‍थगितीही उठली

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्हा परिषदेच्या २४ कोटींचा असमान निधी वाटप करत पदाधिकाऱ्यांनी इतर सदस्यांना डावलले होते. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी ग्रामविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे जि. प.च्या ५२ कोटींच्‍या कामांना ब्रेक लागला होता. यातच जिल्‍हा परिषदेच्‍या (Jalgaon ZP) पदाधिकारींची मुदत संपल्‍याच्‍या दुसऱ्याच दिवशी स्‍थगिती देखील उठविली आहे. यामुळे विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. (jalgaon news zilha parishad member term expired and the suspension of 52 crore works also arose)

जिल्हा परिषदेच्या २४ कोटींच्या निधींची कामे वाटप करताना जिल्हा परिषदेचे १४ ते १५ पदाधिकाऱ्यांनी आपल्या गटात कामांची निविदा प्रक्रिया राबविताना असमान निधी वाटपावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भेट घेऊन त्यांनी ग्रामविकास मंत्रालयात तक्रार केली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या २४ कोटींच्या सर्वच कामांना स्थगिती देवून चौकशी अहवाल मागविला होता. चौकशी समितीने जि. प. बांधकाम व सिंचन विभागाकडून राबविलेल्या निविदा प्रक्रियेचा अहवाल सीईओंना सादर केला. त्यानंतर सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी सदरचा अहवाल ग्रामविकास विभागाकडे मंत्रालयाकडे सादर केला होता.

स्‍थगिती उठविण्यासाठीचे प्रयत्‍न अयशस्‍वी

सत्ताधाऱ्यांसह काही सदस्यांचे शिष्टमंडळ कामांवरी स्थगिती उठविण्यासाठी गेले होते. मात्र, सत्ताधार्‍यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. दोन महिन्यानंतर शेवटी प्रा.डॉ. नीलम पाटील यांनी २४ कोटींचे कामे वगळता इतर मंजूर कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी ग्रामविकास विभागाला पत्र दिले होते. त्यावरुन जिल्हा वार्षिक योजनेतील जलसंधारण व लेखाशिर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत मंजूर कामांपैकी केवळ एक पट निधीच्या मर्यादेत मंजूर करण्यात आलेल्या कामांची स्थगिती उठविण्यात आल्‍याचे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव एकनाथ गागरे यांचे जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे. या आदेशामुळे ५२ कोटींवरील कामांचा मार्ग मोकळा झाला असून उर्वरित अर्धापट ११ कोटींच्या कामे स्थगिती कायम राहणार आहे.

जिल्‍हा परिषदेच्या सत्ताधार्‍यांनी नियमानुसार २४ कोटींचे नियोजन न करता इतर सदस्यांना डावले होते. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरुन शासनाने जिल्हा परिषदेच्या कामांना स्थगिती दिली होती. मात्र आता ३०५४ व ५०५४ अंतर्गत मंजूर कामांपैकी केवळ एक पट निधीच्या मर्यादेत मंजूर कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे. आता उर्वरीत २४ कोटींचे समान पद्धतीने नियोजन केले तर स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्नशील राहील.

प्रा. डॉ. निलम पाटील, जि.प. सदस्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT