Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : तीन महिन्यापूर्वी लग्न; घरात कुणी नसताना तरुणाचे टोकाचा पाऊल

Jalgaon News तीन महिन्यापूर्वी लग्न; घरात कुणी नसताना तरुणाचे टोकाचा पाऊल

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास असलेल्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन (Jalgaon) आत्महत्या केली. हि घटना गुरूवारी (२७ जुलै) घडली. तरुणाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी (Police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

पवन अमरसिंग पवार (वय ३०) असं मयत तरूणाचे नाव आहे. पवन पवार हा तरूण जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. बांधकाम मिस्तरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. पवन पवार याचा विवाह तीन महिन्यापुर्वीच झालेला होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी घरातील सर्वजण कामाला निघून गेले. पवनची आई दुर्गाबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यावेळी पवन घरात एकटाच असतांना त्याने घराच्या मधल्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरी परतलेल्या आईला बसला धक्का 

दरम्यान, पवनची आई घरी परतल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती पवनला मयत घोषीत केलं. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी आणि वहिनी असा परिवार आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT