Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : सात दिवसांवर लग्न असताना घेतला टोकाचा निर्णय; लग्नघरात पसरली शोककळा

Jalgaon News : वाकडी येथे आई- वडील आणि दोन भावांसह अमोल हा वास्तव्यास होता. वडिलांना शेतीकामात तो मदत करत करत कुटुंबाला हातभार लावत होता. अशातच अमोलने शेतात जाऊन गळफास घेतल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

जळगाव : अवघ्या सात दिवसांवर लग्न आले असल्याने घरात सर्व तयारी झालेली होती. खरेदीसह पत्रिका वाटप देखील झाल्या होत्या. यापूर्वीच तरुणाने टोकाचे निर्णय घेत शेतात जात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. 

जळगाव तालुक्यातील वाकडी येथे सदरची घटना घडली आहे. यात उपवर अमोल वाल्मिक पाटील (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. वाकडी येथे आई- वडील आणि दोन भावांसह अमोल हा वास्तव्यास होता. वडिलांना शेतीकामात तो मदत करत करत कुटुंबाला हातभार लावत होता. अशातच अमोलने शेतात जाऊन गळफास घेतल्याची घटना घडली आहे. 

रात्री जेवण करून गेला तो आलाच नाही 

दरम्यान अमोल याचे खामखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील मुलीशी लग्न ठरले. २० मेस हळद व २१ मेस लग्न असल्याने घरात तयारी सुरू होती. पत्रिकांचे देखील वाटप करण्यात आले होते. मुलाचे लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, १२ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर अमोल हा शेतात गेला. यानंतर तो घरी परतलाच नाही. तर सकाळी अमोल याने शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आला. 

आई- वडिलांचा आक्रोश

घटनेची माहिती परिवाराला देण्यात आली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अमोल याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र मुलाच्या मृत्युमुळे आई- वडिलांचा आक्रोश अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT