Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : कुटुंबासमोर गणेश बुडाला; गिरणा नदीवर बाप्पाच्या विसर्जनावेळी घडली घटना

Jalgaon News : दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असे म्हणत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

संजय महाजन

जळगाव : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देत विसर्जित करण्यात आले. मात्र गणपती विसर्जन करताना पाण्यात बुडाल्याच्या काही अनुचित घटना घडल्या आहेत. अशीच घटना जळगाव जिल्ह्यात देखील गणपती विसर्जनासाठी गिरणा नदीवर गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणरायाला काल भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. ठिकठिकाणी जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असे म्हणत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरम्यान जळगाव जिल्ह्यात तापी नदीसह गिरणा, वाघूर आणि इतरही बऱ्याच नद्या व तलावावर गणेश विसर्जन करण्यात आले असून याठिकाणी गर्दी झाली होती. 

दरम्यान गिरणा नदीवर गणेश विसर्जनासाठी सुविधा असल्याने कुटुंबासह विसर्जनासाठी गेलेल्या एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी नदीत बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. आई- वडील आणि बहीण यांच्यासोबत तो पाळधी- तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली गणेश विसर्जनासाठी गेला होता. 

मुर्तीसह पाण्यात गेला वाहून 

बाप्पाच्या मूर्तीसह नदीत उतरल्यानंतर त्याला नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी कुटुंबियांनी आरडाओरड केली. परंतु, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणीच त्याला वाचवू शकले नाही. घटनेनंतर पोलिसांसह नातेवाईकांनी त्याचा शोध कार्य सुरू करण्यात आले. मात्र त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्यात शरद पवार गटाला खिंडार! कामराज निकम यांचा अजित पवार गटात जाहीर प्रवेश

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Mumbai Tourism: 31 डिसेंबरला मुंबईतच पण गर्दी नसलेल्या ठिकाणी फिरायचंय? हे Hidden spots नक्की ट्राय करा

Mumbai Bullet Train : मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकाचं काम बंद! काय आहे नेमकं कारण? वाचा

Eyebrow Growth: मेकअप न करता भुवया नीट कशा दिसतील? वापरा या सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT