Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: दुसऱ्यांदा प्रयत्‍न अन्‌ जीवनाचा अंत; पत्‍नी घरी नसताना उचलले पाऊल

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : यावल शहरातील शिवाजीनगरातील एका विवाहीत (Yawal) तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पत्‍नी शेतात कामास गेली असताना त्‍याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या संदर्भात पोलिस (Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Letest Marathi News)

या संदर्भात मिळालेली माहीती अशी, की शिवाजी शामराव गाढे (वय ३५) हा यावल शहरात कुटूंबासह वास्‍तव्‍यास आहे. पत्नी शेतात कामास गेली असता व त्याची दोन लहान मुलं बाहेर खेळत असतांना २१ फेब्रुवारीला दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या सहाय्याने गळ्फास घेत आत्महत्या केली. शिवाजी शामराव गाढे हा उच्च शिक्षीत असल्यावर देखील लग्नात व आदी सोहळ्यात तो फेटे बांधण्याचे काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत असे. फेटे बांधण्याच्या कामामुळे तो सर्वांना पारिचित होता.

दीड वर्षापुर्वीही केला होता प्रयत्‍न

प्राप्त माहितीनुसार आत्महत्याचा हा त्याचा दुसरा प्रयत्न होता. या आधीही त्यांने एक ते दिड वर्षापुर्वी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळेस मित्र मंडळीच्या मदतीने वेळेवर उपचार झाल्याने तो बचावला होता. मयताचा भाऊ अशोक शामराव गाढे यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शिवाजी गाढे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी केले असुन, पुढील तपास पोलीस विरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

SCROLL FOR NEXT