Photographi day 
महाराष्ट्र

Photography Day : बदलत्या फोटोग्राफी व्यवसायाला प्री- वेडिंगची साथ

Photography Day : बदलत्या फोटोग्राफी व्यवसायाला प्री- वेडिंगची साथ

संजय महाजन

जळगाव : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्री- वेडिंग शूट करण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. त्यासाठी सजावट, मेकअप, लोकेशन, प्रवास आणि फोटोग्राफी यावर बऱ्यापैकी खर्चसुध्दा केला जातो. मात्र त्यात वैयक्तिक आनंद व समाधानापलीकडे इतर विचार नसतो. हा आनंद लुटण्यात विवाहपुर्वी केली जाणारी प्री– वेडिंग शूटचा ट्रेंड वाढला. हा वाढता ट्रेंड म्‍हणजे बदलत्‍या फोटोग्राफी व्‍यवसायाला साथ आहे. (jalgaon-news-world-photographi-day-pre-wedding-shoot)

आनंदीबाई– गोपाळराव जोशींच्‍या जीवनावरील फोटो शूट

अंजली आणि भूषण पाटील या नवविवाहीत दाम्पत्याने 'प्री वेडिंग शूट'च्या माध्यमातूनही सामाजिक संदेश देता येतो; याचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारीत फोटो शूट करीत शिक्षणाच्या प्रसाराचा संदेश दिला आहे. शूटमधून आनंदीबाई यांचे माहेरचे नाव हे यमुना होते. त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा वयाने बरेच मोठे असलेल्या गोपाळराव यांच्याशी झाले होते. पुरोगामी विचाराच्या गोपाळरावांनी त्या काळात देखील महिला शिक्षणाला पाठिंबा दिला होता. आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी पूर्ण साथ दिली होती. त्याच विषयावर आधारीत हे फोटोशूट आहे.

चित्रपट पाहिल्‍यावर शुट निश्‍चीत

दोघेही पुण्यात बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. लग्न ठरल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर फोटो शूट करण्याचा विचार केला होता. नुकताच आलेला आनंदी- गोपाळ हा चित्रपट बघितल्यावर त्याच विषयावर फोटो शूट करण्याचा निर्णय फायनल केला. सामाजिक संदेश भूषण तुकाराम पाटील हे मुळचे धुळ्याचे तर अंजली ह्या अमळनेरच्या. त्यांचा विवाह नुकताच झाला. मात्र त्या आधी प्री वेडींग शूट केले होते. भूषण व अंजली हे आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या विचारांपासून प्रेरीत झाले. त्यामुळे त्यांनी लग्नाआधी अशाच प्रकारे फोटो शूट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही छायाचित्रे बघितल्यानंतर जुनी आठवण व जागतिक फोटोग्राफी डे निमित्त हा एक चांगला संदेश देता येतो बदलत्या फोटोग्राफी व्यवसायात प्री- वेडिंगला दिले जात आहे. त्यामुळे फोटोग्राफर डे निमित्त हे वेगळं काहीतरी तिला समाधान झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT