World AIDS Day  
महाराष्ट्र

World AIDS Day एड्‌सबाधितांची संख्या सहावरून अर्धा टक्क्यांवर; कोरोनात १६ जणांचा मृत्यू

एड्‌सबाधितांची संख्या सहावरून अर्धा टक्क्यांवर; कोरोनात १६ जणांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एड्‌स बाधीत व्यक्ती म्‍हटले तर उभे राहते अंधकारमय भविष्य. परंतु एड्‌सबाधीतांवर वेळीच उपचार केल्यास ती व्यक्तीही सर्वसामान्यप्रमाणे जीवन जगू शकते हे जिल्हा एड्‌स प्रतिबंध समितीने केलेल्या उपचारावरून स्पष्ट होते. २००८ मध्ये जिल्ह्यात एड्‌सबाधितांची टक्केवारी ५.५७ इतकी होती. ही संख्या आता ०.६५ टक्क्यांवर आली आहे.

जिल्ह्यात जळगाव (Jalgaon) व अमळनेर (Amalner) या दोन ठिकाणी एआरटी केंद्रे आहेत. यात, एचआयव्ही संसर्गी व्यक्तींना संधिसाधू आजार होऊ नये व आरोग्य सदृश राहण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधी दिली जाते. आतापर्यंत १० हजार ७५४ व्यक्तींना रोग प्रतिकार करणारी औषधी देण्यात आली आहे.

सात महिन्यात १७३ बाधीत

जिल्ह्यात २००७-०८ मध्ये १ हजार ४२३ रुग्ण (५.५७) एड्‌स बाधीत आढळले होते. ११४ गरोदर (०.७५) महिलांना एड्‌सने ग्रासले होते. जिल्ह्यात २३ आयसीटीसी (एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र) असून त्या ठिकाणी एचआयव्हीची मोफत तपासणी केली जाते. एप्रिल ते ऑक्टोंबर २०२१ दरम्यान आयसीटीसीकडून ८२ हजार ४०२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १७३ जण बाधीत आढळून आले. त्यात ९ गरोदर मातांचा सामावेश होता.

कोरोनाने १६ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात एचआयव्ही संसर्ग असलेल्या ३० पुरूष, २० महिला व एक तृतीयपंथीय अशा एकूण ५१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील दहा पुरूष, पाच महिला व एक तृतीय पंथीय अशा सोळा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ३५ व्यक्ती सद्य स्थितीत चांगल्या स्थितीत आहेत.

आकडे बोलतात

वर्ष.........केलेल्या एचआयव्ही चाचण्या....बाधीत.....बाधीतांचे प्रमाण

२००७-०८....२५ हजार ५६६..............१४२३......५.५७ टक्के

२०१०-११....४९ हजार ७४०..............१९०३......३.८३

२०१४-१५......१ लाख ७४ हजार ६८१...१०२४.......०.५९

२०१९-२०.....३ लाख ३५ हजार १०९.....५६७........०.१७

२०२१-२२......१ लाख ५६ हजार ४५......१८२........०.१२

एकूण..........२३ लाख २२ हजार ९६...१५ हजार ३७...०.६५

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT