Womens Day Saam tv
महाराष्ट्र

Womens Day: ‘कोरोना’ने कुंकू पुसले..जिद्दीने कुटुंब सावरले

‘कोरोना’ने कुंकू पुसले..जिद्दीने कुटुंब सावरले

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : भिंत खचली..चूल विझली.. होते नव्हते गेले.. प्रसाद म्हणुनी पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले..मोडून पडला संसार.. तरी मोडला नाही कणा.. पाठीवरती हात ठेवून नुसते 'लढ' म्हणा.. या काव्यपंक्तीचा आदर्श आपल्या कृतीतून दाखवणाऱ्या महिलेने कोरोना (Corona) काळात पती गमावल्यानंतर चाळीशीत 'वैधव्य'च्या शिक्क्याने न डगमगता स्वतःला सिद्ध केले. (jalgaon news Womens Day story husband death Corona second wave but stubbornly heals family)

‘हम भी किसीसे कम नही’, असे म्हणत अवघ्या काही (Womens Day) दिवसात दुःख बाजूला सारत तिने पदर खोचला अन् चक्क ती पीठगिरणी चालक बनली. संसाराचा गाडा प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीरित्या कसा सांभाळावा, याचा आदर्श मंगरुळ (ता. अमळनेर) येथील साधनाताई सुनील पाटील यांनी घालून दिला आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती असली तरी त्याला जोडव्यवसाय म्हणून साधनाताईच्या सासऱ्यांनी १९७६ मध्ये गावात पिठाची गिरणी सुरू केली होती. बरेच वर्षे सासऱ्यांनी पिठगिरणी चालवली. त्यात त्यांनी कुटुंबातील सदस्यांचे संगोपन, शिक्षण, सोबतच कौटुंबिक उदरनिर्वाह त्यांनी चालवत आणला. कालांतराने त्यांचे पती (कै) सुनील पाटील यांनी पिठगिरणीचा व्यवसाय तब्बल २५ वर्षे सांभाळला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होत्याचे नव्हते झाले. अन् साधनाताई यांचे पती सुनील पाटील (वय ५०) यांचे गेल्या १५ एप्रिल २०२१ ला कोरोनाने निधन (Corona Death) झाले.

गिरणीची चाके पुन्‍हा फिरविली

वयाच्या चाळीसाव्या वर्षी साधनाताईच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. दोन मुली, एक मुलगा सोबतच वृद्ध सासू, सासरे यांची कौटुंबिक जबाबदारी साधनाताईंवर आली. गेली २५ वर्षे सांभाळत असलेल्या पिठाच्या गिरणीची चाके अचानक थांबली होती. वृद्ध सासरे हे पण कोरोनातून कसेबसे बाहेर आले. ते थकले असल्याने त्यांच्याकडूनही आता पिठगिरणी चालविण्याचे काम होत नाही. घरात एकही जण सरकारी नोकरीत नाही. शेतीपण बिन भरवश्याची झाली आहे. मग कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? पिठगिरणी बंद करायची की भाड्याने चालवायला द्यायची? कुटुंब सांभाळणारा व्यक्तीच गेल्याने यापुढील सर्वोतोपरी मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, हे साधनाताईंनी ओळखले. वृद्ध सासू, सासरे आणि तीन मुलांचा संसार सांभाळणे साधनाताईंना कठीण जाणार होते. संसाराच्या अर्ध्यावरच पतीचे निधन झाल्याने त्या पूर्णपणे खचल्या होत्या. घर कसे चालणार, याची त्यांना विवंचना होती. पती अचानक सोडून गेल्याचे अपार दुःखही तिला सोसवेना. पतीच्या जाण्याची पोकळी मुळीच भरणारी नाही. पण या दुःखातून तिला सावरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पती चालवत असलेली पिठगिरणी सुरू करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. दीर विकास भदाणे यांनीही त्यांना उमेद दिली. त्या गेल्या १० महिन्यांपासून गावात पिठगिरणी चालवत आहेत. दुःख पचवणं कठीण आहे, परंतु त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग त्यानी स्वतःच शोधून काढला.

नव्‍या उमेदीने उभे रहावे

कोरोनामुळे आज अनेक मुलांचे मातृ-पितृ छत्र हिरावले गेल्याने अनेक मुले उघड्यावर आली आहेत. कुणी अनाथ झालीत. त्यांना सांभाळायचे काम शासन पातळीवर होईलच, मात्र शासन देऊन-देऊन काय देणार? शेवटी आपल्या रोजीरोटीची व्यवस्था आपल्यालाच बघावा लागेल. त्यामुळे आपल्या कुटुंबावर आलेल्या विदारक परिस्थितीवर रडत न बसता पदर खोचून अन्य महिलांनीदेखील या दुःखातून सावरत नव्या उमेदीने उभे राहायला हवे, असा मौलिक सल्ला ही साधनाताई देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT