Railway Saam tv
महाराष्ट्र

महिलेने लावली रेल्‍वे बोगीला आग; सदर प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

संजय महाजन

जळगाव : कांद्याची वाहतुक करत असलेल्‍या किसान एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर उभी असताना एका महिलेकडून बोगीत आग लावण्याचा प्रयत्न केला. माचीसची जळती काडी बोगीत फेकून आग लावण्याचा प्रयत्न केल्‍याचा प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये (CCTV) कैद झाला आहे. वेळीच बोगीला आग लागल्याचे लक्षात आल्‍याने (Railway) रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझविल्‍याने अनर्थ टळला. (jalgaon news Woman sets fire to kisan railway bogie in bhusawal station)

सांगोल्याहून मुझफ्फरपूरकडे जाणाऱ्या कांदा (Onion) वाहतुकीच्या रेल्वे वॅगनला सोमवारी आग लागल्‍याचा प्रकार झाला. ही गाडी सायंकाळी सातच्या सुमारास फलाट क्रमांक सातवर उभी असताना स्थानकावरील बोग्यांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आली. इंजिनपासून पाचव्या क्रमांकाच्या (Bhusawal) बोगीतून धूर येत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी ताबडतोब गाडीचे चालक व गार्ड यांना सूचना दिली. या वेळी फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली.

माथेफिरू महिलेचा कारनामा

किसान एक्स्प्रेस (Kisan Express) फलाट क्रमांक सातवर उभी असताना बोगीत आग लागताच रेल्वेस्थानकावर एकच धावपळ उडाली. या वेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लागलीच बादल्यांनी पाणी फेकून आग विझविली. या वेळी आरपीएफ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. नेमकी आग कशी लागली, याची पाहणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका माथेफिरू महिलेने आगपेटीची काडी पेटवून रेल्वेच्या डब्यात फेकल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रेल्वे पोलिस या महिलेचा शोध घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT