एसटीचे १६० कर्मचारी कामावर; २०८ जणांवर कारवाई

एसटीचे १६० कर्मचारी कामावर; २०८ जणांवर कारवाई
St Strike
St StrikeSaam tv
Published On

धुळे : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यांसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा चार महिन्यांपासून संप सुरू आहे. या संपाचा दहावी- बारावीच्या परीक्षार्थींना फटका बसत आहे. काही कर्मचाऱ्यांनी संपातून (St Strike) माघार घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारपर्यंत सरासरी ३२ चालक, ५५ वाहक, ३९ प्रशासकीय कर्मचारी, ३४ कार्यशाळा कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. २० कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. (dhule news 160 employees join at ST Action against 208 persons)

St Strike
अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला दंडासह 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

संपात सहभागी असलेल्या २०८ कर्मचाऱ्यांवर विविध स्वरूपाची कारवाई झाली आहे. त्यात सरासरी ३८ कामगारांवर विभागीय (Dhule News) कार्यालयाने बडतर्फीची कारवाई केली आहे. तसेच १७० जणांना आरोपपत्र दिले आहे. एसटी महामंडळाने १० मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची संधी दिली होती. त्यानुसार काही कर्मचारी कामावर हजर झाले आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोजक्या बस सुरू आहेत.

संपाचा विद्यार्थ्यांना फटका

जिल्ह्यातील चार आगारांतून ९६ बस धावत आहेत. त्यात (Dhule) धुळे २२, शिरपूर १०, साक्री २८ आणि शिंदखेडा (Shindkheda) आगारातील ३६ बसचा समावेश आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा ग्रामीण व शहरी परिसरातील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा (Exam) सुरू झाल्या आहेत. यात मंगळवारपासून (ता. १५) दहावीची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

२२ मार्चकडे लक्ष

तथापि, एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाविषयी त्रिस्तरीय समितीच्या अहवालावर २२ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले. तसेच २२ मार्चपर्यंत एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये, असे निर्देश दिले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आतषबाजी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com