महाराष्ट्र

दहा वर्ष उलटले तरी ४२ पतसंस्थांत २६७ कोटी अद्यापही अडकलेलेच

दहा वर्ष उलटले तरी ४२ पतसंस्थांत २६७ कोटी अद्यापही अडकलेलेच

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील अडचणीतील ४२ पतसंस्थांमध्ये अद्यापही एक लाख ६९ हजार २८८ ठेवीदारांचे २६७ कोटी ५१ लाख रुपये अडकून पडले आहेत. २००६ मध्ये जिल्ह्यातील पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. तेव्हापासून ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर.) या मल्टिस्टेट पतसंस्थेत ज्याप्रमाणे कर्जदारांकडून वसुली पुणे पोलिसांनी केली त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी जिल्ह्यातील पतसंस्थेच्या कर्जदारांकडून कर्ज वसुली करावी, अशी अपेक्षा ठेवीदारांची आहे. तब्बल १६ वर्ष झाले, अजून किती वर्ष ठेवीदार अडकलेल्या ठेवींसाठी पाठपुरावा करणार? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (jalgaon-news-Without-deposit-of-over-one-and-a-half-lakh-in-credit-unions)

जिल्ह्यातील बी. एच. आर. वरील अवसायक जितेंद्र कंडारे, त्यांच्या साथीदारांनी मिळून केलेला गैरव्यवहार समोर आल्यानंतर अनेक मोठे मासे त्यात अडकल्याचे दिसून आले. पुणे येथे एका ठेवीदार महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जळगावमध्ये संशयितांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकून अनेक प्रकारची संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. त्यात पतसंस्थेचे मोठे कर्जदार आढळून आले. त्यात अनेक मोठे उद्योजक, राजकारणी इतरांनी कोट्यवधींचे कर्ज पावत्या मॅचिंग करून कर्ज फेडल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी ज्याप्रकारे बीएचआर पतसंस्थेच्या कर्जदारांवर कारवाई केली, तशी कारवाई जिल्ह्यातील ४२ अडचणीच्या पतसंस्थांतील कर्जदारांवर करावी. जेणे करून ठेवीदारांनी घामाचा पैसा जमा करून ठेवलेल्या ठेवी परत मिळतील, अशी मागणी ठेवीदारांची आहे.

ठेवीदार संघटना आता शांत

२००६ मध्ये जेव्हापासून पतसंस्था डबघाईस आल्या तेव्हा अनेक ठेवीदार संघटना स्थापन झाल्या होत्या. प्रत्येक संघटनेने आंदोलन करीत जळगावसह पुणे, मुंबई गाजविली. नंतरच्या काळात मात्र ठेवीदार संघटनांनी आपल्या आंदोलनाच्या तलवारी म्यान केल्या. तेव्हापासून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणे बंद झाले. २०१८ मध्ये तत्कालीन सहकार आयुक्तांनी (पुणे) ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला होता. तो प्लॅनही आता थंड बस्त्यात जमा झाला आहे.

आकडे बोलतात...

- अडचणीतील पतसंस्था - ४२

- पतसंस्थांचे कर्जदार - ४५ हजार एक

- कर्जाची रक्कम - ७०४ कोटी चार लाख

- डीडीआर विभागाने केलेली वसुली - ३५२ कोटी २९ लाख

- कर्ज परतफेड केलेले कर्जदार - ३४ हजार ४३९

- शिल्लक कर्जदार - दहा हजार ५६२

- वसुल करावयाची शिल्लक कर्जाची रक्कम - ३५१ कोटी ७५ लाख

- जिल्ह्यातील ठेवीदार - चार लाख ४८ हजार ९१३

- अडकलेल्या ठेवी - ८४६ कोटी १६ लाख

- ठेवी परत मिळालेले ठेवीदार - चार लाख ४६ हजार ३०९

- ठेवींची रक्कम - ५७८ कोटी ६५ लाख

- ठेवी न मिळालेले ठेवीदार - एक लाख ६९ हजार २८८

- ठेवींची रक्कम - २६७ कोटी ५१ लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT