Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

मान्‍सूनपुर्व पावसासह पुन्हा वादळी तडाखा; केळीचे नुकसान, तुरळक गारपीट

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : तालुक्यातील सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द, खिरोदा (प्र. यावल) आणि तापी पट्ट्यात बुधवारी (ता. ८) सायंकाळी पुन्‍हा वादळी पावसाने तडाखा दिल. जोरदार वारा असल्‍याने झाडे कोलमळून पडली असून, केळी (Banana) पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (jalgaon news Winds again with pre monsoon rains Banana crop damage)

सावखेडा बुद्रूक येथे सायंकाळी चारच्या सुमारास (Jalgaon News) आलेल्या जोरदार हवेने ग्रामपंचायतीजवळ असलेला सुमारे १५० वर्षे जुना वटवृक्ष प्रल्हाद बाबूराव पाटील यांच्या घरावर कोसळला. त्यात त्यांचे ट्रॅक्टरही दबले गेले. आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले आहे. परिसरातील युवकांनी ताबडतोब घरात जाऊन घरातील सदस्‍यांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घरांचे पत्रेही उडाली

सावखेडा परिसरात या जोरदार हवेमुळे विजेचे खांब वाकले असून, तारा तुटल्या आहेत. येथे सुरू असलेल्या जोरदार हवेमुळे (Rain) सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द, गौरखेडा, लोहारा, खिरोदा (प्र यावल), कुंभारखेडा गावातील केळीचे नुकसान झाले आहे. तसेच खिरोदा (प्र. यावल) येथील बेघर वस्तीतील अनेक घरांचे पत्रे उडाले असून, तेथेही केळीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तापी किनाऱ्यावरील धामोडी या गावात हलकी गारपीट झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: क्रुरतेचा कळस! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण... धक्कादायक VIDEO

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

Bike Stunt Video Viral: भयंकर! भररस्त्यात तरूणाची बाईकवर स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Jalana News: ब्रेकिंग! मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घातला घेराव... जोरदार घोषणाबाजी; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT