Raj Thackeray Warrant: राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट, काय आहे प्रकरण?

राज ठाकरे यांना २००८ साली कल्याणमध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते.
Raj Thackeray Warrant News, Raj Thackeray latest Marathi News
Raj Thackeray Warrant News, Raj Thackeray latest Marathi NewsSaam TV
Published On

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तारखेला हजर राहिले नसल्यामुळे त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाने वॉरंट काढलं आहे. २००८ साली राज ठाकरे यांना कल्याणमध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. सांगली जिल्ह्यात (Sangli District) मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. या प्रकरणाबाबतचा त्यांच्यावर गुन्हा शिराळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. (Raj Thackeray latest Marathi News)

सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात राज ठाकरे हे नाव खूप चर्चेत असून त्याला कारण आहे ते त्यांनी घेतलेल्या भोंग्याबाबतच्या भूमिकेचे. एकीकडे राज यांनी राज्य सरकारला भोंग्यांवरती कारवाई करण्यासाठीचा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे त्यांनी राज्य सरकारचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाचा रोख बघता त्यांच्या अडचणीत वाढ होणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

अशातच आता शिराळ्यातील कोर्टातून (Court of Shirala) जुन्या प्रकरणात राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच हे वॉरंट ६ एप्रिल रोजी जारी करूनही आतापर्यंत राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारल्याची माहिती समोर येत आहे.

हे देखील पाहा -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांच्या वर गुन्हा दाखल आहे. या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज यांच्या हे विरोधात वॉरंट काढल्याचं समजत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com