suicide saam tv
महाराष्ट्र

पत्‍नीने येण्यास दिला नकार; दोन चिमुकल्यांसह तरुणाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

पत्‍नीने येण्यास दिला नकार; दोन चिमुकल्यांसह तरुणाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : बोरखेडा (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी व खडी मशिनवर कामास असलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाने आपल्या सहा व चारवर्षीय चिमुकल्यांना धावत्या रेल्वेखाली झोकून देत स्वतः देखील आत्महत्या (Suicide) केली. रविवारी (ता. १३) सकाळी हा प्रकार घडला. याबाबत रेल्वे पोलिसांनी (Railway Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (jalgaon news Wife refuses to come Young man suicide by jumping in front of train with two child)

बोरखेडा येथील जितेंद्र दिलीप जाधव (वय ३१) हे खडी मशिनवर काम करतात. त्यांनी रविवारी सकाळी अकराच्या सुमारास नगरदेवळा रेल्वेस्थानकात (Railway) चिराग (वय ६) व खुशी (वय ४) या दोघा चिमुकल्यांना धावत्या सचखंड एक्स्प्रेसखाली ढकलून स्वतः देखील आत्महत्या केली. तिघांचे देह अक्षरशः छिन्नविछिन्न झाले होते. नगरदेवळा स्टेशनमास्तरांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर रेल्वेचे चाळीसगाव येथील उपनिरीक्षक शेख, पाचोरा येथील रेल्वे हेडकॉन्स्टेबल भावसार व कॉन्स्टेबल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पाचोरा (Pachora) ग्रामीण रुग्णालयात आणले. शवविच्छेदनानंतर ते नातलगांच्या ताब्यात देण्यात आले.

पत्‍नीला घेण्यासाठी गेला होता

नगरदेवळा स्थानकात रेल्वे कि. मी. क्रमांक ३५३ अप रेल्वेमार्गावर ही घटना घडली. मृत जितेंद्र जाधव हे पत्नीला घेण्यासाठी गेले होते. परंतु, तिने येण्यास नकार दिल्याने, तसेच दोघांमध्ये काही वाद असल्याने जितेंद्र यांनी दोघा चिमुकल्यांसह आत्महत्येचे कठोर पाऊल उचलले असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यांच्या काही आप्तेष्टांनीही त्यास दुजोरा दिला आहे. पाचोरा रेल्वे पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT