‘व्‍हॅलेंटाईन डे’ साजरा करणाऱ्यांचा लावणार विवाह; हिंदू राष्ट्र सेनेचे निदर्शने

‘व्‍हॅलेंटाईन डे’ साजरा करणाऱ्यांचा लावणार विवाह; हिंदू राष्ट्र सेनेचे निदर्शने
Valentine Day
Valentine Daysaam tv
Published On

जळगाव : ‘व्हॅलेंटाईन्स डे' हा पाश्‍चात्य संस्कृतीचा सण असून या माध्यमातून हिंदू संस्कृतीवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत हिंदू राष्ट्र सेनेने याला विरोध जाहीर केला आहे. 'व्हॅलेंटाईन्स डे' (Valentine Day) साजरा करणार्‍यांचा विवाह लावून देण्याची तयारी संघटनेने केली आहे. आज जोरदार निदर्शने करून संघटनेतर्फे शहरातून रॅली काढली. (jalgoan news Weddings for Valentine Day celebrants Hindu Rashtra Sena protests)

Valentine Day
Washim: आधी 8 वर्षीय मुलाचा मृतदेह, दुसऱ्या दिवशी त्याच विहिरीत वडिलांचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

व्‍हॅलेंटाईन विक साजरा झाल्‍यानंतर आज व्‍हॅलेंटाइन डे आला. याला हिंदू राष्‍ट्र सेनेतर्फे विरोध करत हा दिवस करणाऱ्यांवर हिंद राष्‍ट्र सेना लक्ष ठेवून असेल. तसेच जळगाव (Jalgaon) शहरातील टावर चौक परिसरात निदर्शने आंदोलन केली. परंतु, पोलिसांनी (Police) सर्व कार्यकत्‍र्यांना पोलिस स्‍टेशनमध्‍ये नेले.

लग्‍नाचे सर्व साहित्‍य सोबत

हिंदू संस्कृतीचे आणि धर्माचे पालन होण्यासाठी १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाइन डे साजरा न होऊ देण्याबाबत हिंदू राष्ट्र सेनेतर्फे हा दिवस माता- पितृ पूजन दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शहरात कुठे तरुण- तरुणी 'व्हॅलेटाइन डे' साजरा करताना दिसले. तर त्‍यांचा जागेवरच विवाह लागण्याची तयारी आहे. यावेळी मुला– मुलींच्‍या आई- वडिलांना बोलावून मुलांना समज दिली जाणार आहे. नाहीच एकले तर जागेवरच विवाह (Marriage) लागला जाणार आहे. याकरीता सोबत मंगळसुत्र, कुंकू, ब्राह्मण तसेच अन्‍य साहित्‍य घेवून फिरत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com