Jalgaon News  Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : अपघातात जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; बातमी समजताच पतीची रेल्वेसमोर उडी

Jalgaon News : अपघातात जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; बातमी समजताच पतीची रेल्वेसमोर उडी

Rajesh Sonwane

जळगाव : पती- पत्नी मोटारसायकलने जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात (Accident) पत्नी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर उपचार सुरु असताना पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच (Jalgaon) विरहात पतीने थेट धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. (Maharashtra News)

राजू सोनसिंग राठोड (वय ३०, रा. बोदर्डी, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. २९ सप्टेंबरला जळगाव-भुसावळदरम्यान भादली रेल्वेस्थानकाजवळ तीसवर्षीय तरुणाचा रेल्वेखाली येऊ मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून जिल्हा शासकीय रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) आणण्यात आले. नशिराबाद पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. कपड्यात मिळालेल्या कागदावरून त्याचे नाव राजू सोनसिंग राठोड असे असल्याचे निष्पन्न झाले. 

कारण समोर येताच सारे थबकले 

राजू राठोड याच्या मृत्यूचे कारण समोर येताच (Police) पोलिसही थबकले. तीन दिवसांपूर्वीच संगीता राठोड यांच्या मृत्यूप्रकरणी याच नशिराबाद पोलिसांत झीरो नंबरने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असताना आज पती राजू राठोड यांच्या मृत्यूचीही तशीच नोंद करण्यात आली. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT