जळगाव : तुलसी विवाहानंतर वधू- वरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा टिकून राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाह इच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी; या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेच्यावतीने श्री मंगळदेव ग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य प्रमाणात तुलसी विवाहाच्या महासोहळा आयोजित केला जातो. हा सोहळा आज भव्य स्वरूपात पार पडला. (jalgaon-news-wedding-of-Tulsi-took-place-in-the-Mangahagraha-temple-in-amalner)
जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह देवस्थान हे जागृत देवसथान म्हणून मानले जाते. या देवस्थानच्यावतीने दरवर्षी तुळशी विवाहाचे भव्य स्वरूपात आयोजन केले जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होत होता. यावर्षी मात्र कोरोनाचा कहर बऱ्यापैकी ओसरल्याने हा विवाह महासोहळा भव्य प्रमाणात करण्यात आला.
विवाह योग लवकर जुळत असल्याची श्रद्धा
मागील काळात कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने अनेक भाविकांना दर्शन घेता आले नव्हते. त्याच बरोबर विवाह सोहळा ही आयोजित करता आला नसल्याने अनेक भाविकांना निराशा पदरी पडली होती. तुळशी विवाहात सहभागी झाले तर आपल्या पाल्यांचे विवाह योग लवकर जुळून येतात; अशी अनेक भाविकांची श्रद्धा असल्याने मोठ्या संख्येने भाविक आपल्या विवाह योग्य तरुण तरुणींना घेऊन या तुळशी विवाहास हजेरी लावत असतात. आज देखील या ठिकाणी शेकडो भाविकांनी तुळशी विवाहास हजेरी लावली होती.
शाही सोहळ्यात वरण–बट्टीचे जेवण
पारंपरिक पद्धतीने लावण्यात येत असलेल्या विवाह परंपरेनुसार या ठिकाणी भव्य तुळशी विवाह पार पडला. यावेळी आकर्षक रोषणाई, सनई, सहमंगल वाद्य लावण्यात आली होती. शिवाय कोणताही विवाह सोहळा म्हटल की वऱ्हाडींसाठी जेवणाचा मेनू हा सर्वात महत्वाचा मानला जातो. जळगाव जिल्ह्यात खास खानदेशचा मेनू म्हणून वरण– बट्टी आणि वांग्याच्या बेत विवाह समारंभात ठेवला जातो अशाच पद्धतीचा मेनू या ठिकाणी जेवणासाठी असल्याने वऱ्हाडींनी विवाह सोहळा मंगलग्रहाचा दर्शन आणि जेवणाचा आनंद लुटला असल्याचं पाहायला मिळाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.