अखेर आदिवासी सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर सुरू

अखेर आदिवासी सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर सुरू
navapur sugar factory
navapur sugar factory
Published On

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील डबघाईला आलेला आदिवासी सारख कारखाना भाडे तत्‍त्‍वावर सुरू करण्यात आला आहे. गळीत हंगाम गव्हाण पूजनाचा शुभारंभ झाला असून, येथे दोन हजार ५२५ रुपये प्रतिटन भाव ऊसाला दिला जात आहे. (nandurbar-news-navapur-taluka-tribal-co-operative-sugar-factory-started-on-lease-basis)

navapur sugar factory
कृषी कायदे रद्द करण्याचे स्वागत; नवापूरमध्‍ये फटाके फोडून जल्‍लोष

नवापुर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे गेल्या २० वर्षापासून गरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्त्वावर माजी आमदार सुरूपसिंग नाईक यांच्या परीवाराद्वारे वर्चस्व करून चालवला जात होता. परंतु राजकीय हस्तक्षेप व अनियोजित कार्यक्षमतेमुळे गेल्या २० वर्षात सदर साखर कारखाना विकासाऐवजी डबघाईला आला होता. शेतकऱ्यांना योग्य तो भाव कारखान्याद्वारे दिला जात नसून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने नवापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साक्री तालुक्यातील द्वारकाधीश कारखान्याला ऊस विक्रीला सुरुवात केली होती. डोकारे कारखाना संचालक मंडळाला द्वारकाधीश साखर कारखानाचे वर्चस्व लक्षात येताच डबघाईला आलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे अखेर 15 वर्षासाठी भाडेतत्वावर चालवायला दिला असून त्याचा प्रथम गळीत हंगाम गव्हाण पूजनाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कमी दर व पैसे न देणे यामुळे चर्चेत होता कारखाना

राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे डबघाईला आलेला आदिवासी सहकारी साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना इतर कारखान्यापेक्षा मिळणारा कमी दर व वेळेवर पैसे न देणे अशा अनेक कारणांमुळे कारखाना गेली अनेक वर्षे चर्चेत राहिला. अखेर पंधरा वर्षासाठी द्वारकाधीश साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन कारखाना सुरू झाला असून 2 हजार 525 रुपये प्रतिटन उसाला भाव जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी असलेला सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळून न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. नवापूर तालुक्यात राजकीय क्षेत्रात अनेक दशकांपासून वर्चस्व असलेल्या नाईक परिवाराला अखेर कारखाना भाडेतत्त्वावर का द्यावा लागला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com