Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

चाळीसगाव तालुक्यात जलबचतीची चळवळ; ‘सकाळ रिलीफ फंड’चे सहकार्य

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यात सध्या मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा अंतर्गत जलबचतीच्या चळवळीला गती मिळाली आहे. गावागावांमध्ये अभियानाचे पाचपाटील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत आहेत. या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’चे सहकार्य मिळत आहे. या कामांमुळे भूजल (Jalgaon News) पातळी वाढण्यास मदत होत असल्याने लोकसहभागही कमालाची वाढला आहे. याशिवाय इतरही अनेक संघटनांचे आर्थिक सहकार्य मिळत असल्याने यावर्षी सुमारे ३० गावांमध्ये कामे सुरू आहेत. (jalgaon news Water saving movement in Chalisgaon taluka Support of Sakal Relief Fund)

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्याचे भूमिपुत्र तथा ‘ईडी’ संचलनालयाचे उपायुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या संकल्पनेतून मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा अभियानाचे पाचपाटील गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये पाणी बचतीसंदर्भात जनजागृती करीत आहेत. ग्रामस्थांसह शेतकऱ्यांच्या कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित केल्‍या जात आहेत. या माध्यमातून नाला खोलीकरणासह बांध बंधिस्ती, चर मारणे, गाळ टाकणे, शोषखड्डे, विहीर पुर्नभरण, पांदी रस्ता तयार करणे आदी कामे केली जात आहेत. ही कामे पूर्णत्वास आल्यानंतर भूजल पातळी वाढून पाण्याची समस्या कायमची सुटण्यास मदत होईल, असा विश्‍वास पाटील टीमला आहे. पाचपाटील टीमचे शेखर निंबाळकर, एकनाथ माळतकर, डॉ. संदीप राठोड, प्रशांत गायकवाड, दिनेश जाधव, राहुल पाटील यांच्यासह सर्व गाव प्रमुख तसेच विविध सामाजिक संस्थांचे तसेच ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ ही जलवारी पुढे नेत आहेत.

‘सकाळ’ची मदत

उपक्रमासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’मधून गेल्या चार वर्षांपासून ‘जेसीबी’सह पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यासाठी लागणारे डिझेल त्या त्या गावातील ग्रामस्थ उपलब्ध करून देत असून ‘जेसीबी’ ऑपरेटरच्या राहण्याची व जेवणाची सोय देखील शेतकरी बांधवच करीत आहेत. त्यामुळे या कामांमध्ये लोकसहभाग वाढल्याने कामांनी गती घेतली आहे. सद्यःस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील हातले, जावळे, हातगाव व राजदेहरे या गावांमध्ये तर पाचोरा तालुक्यात पिंप्री, वडगाव, आंबे तांडा तसेच कन्नड तालुक्यातील नागद तांडा, गोपेवाडी व वडगाव (जाधव) या गावांमध्ये अनेक कामे सुरू आहेत. ‘सकाळ’सह नाम फाउंडेशन, चेंबूर रोटरी क्लब, भारतीय जैन संघटना यासारख्या संस्थांच्या सहकार्याने सध्या तीस गावांमध्ये कामे केली जात आहेत.

मनसंधारणासोबत जलसंधारण

सर्व कामांवर डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण हे जातीने लक्ष देत आहेत. शासनाला जमले नाही, असे काम त्यांनी विविध संस्थांच्या मदतीने लोकसहभाग वाढवून केले आहे. त्यामुळेच त्यांना गावागावातून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या गावात काम करण्यापूर्वी त्या गावातील ग्रामस्थांना डॉ. चव्हाण हे जलबचतीसंदर्भात मार्गदर्शन करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Puran Poli Recipe : महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी न फुटता कशी बनवायची; गृहिणींसाठी खास टिप्स

Today's Marathi News Live : दिंडोरी लोकसभेत भाजपच्या माजी खासदाराची बंडखोरी

Nashik Election : नाशिकचा तिढा सुटला, पण वेढा कायम!; भुजबळ समर्थक नाराज, समता परिषदेनं उमेदवाराचं नावच सांगितलं

Credit Debit Cards Charges: ग्राहकांना मोठा झटका; 'या' २ बॅंकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ

Clean Silver Jewellery: घरीच्या घरी चांदीच्या वस्तू स्वच्छ करायच्या; वापरा 'या' पद्धती

SCROLL FOR NEXT