कच्च्या कैऱ्यांपासून आमसूल; आवक कमी मात्र दर मिळतोच चांगला

कच्च्या कैऱ्यांपासून आमसूल; आवक कमी मात्र दर मिळतोच चांगला
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, तोरणमाळ परिसरात आदिवासी बांधवांकडून शेतीसोबत आंब्याच्या झाडांची लागवड करून उन्हाळ्यात आंब्याच्या कच्च्या कैऱ्यापासून आमसूल तयार करून विक्री करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असते. यातून आदिवासी (Nandurbar News) बांधवांना रोजगार उपलब्ध होतो. आज धडगाव (Dhadgaon) शहरातील सोमवारच्या आठवडी बाजारात आदिवासी बांधव आमसूल विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. (nandurbar news Amsul from raw mangoes transport other state)

Nandurbar News
बोगस डॉक्टराविरुद्ध नंदुरबारमध्ये गुन्हा; अनेक वर्षापासून सुरू होता दवाखाना

गेल्या दोन वर्षात आमसूल तयार करून विक्रीची प्रक्रिया काही अंशी मंदावली होती. परंतु यंदा गेल्या दोन वर्षाचे नुकसान भरून निघेल असा चांगला दर मिळत असल्याने सातपुड्यात आदिवासी बांधवांकडून कच्च्या कैऱ्यापासून आमसूल तयार करण्याची लगबग सुरू आहे. कच्च्या कैर्‍यांपासून आंबा सोलून बारीक तुकडे करून उन्हामध्ये वाळवून विक्रीसाठी आणलेल्या आमसूलला 160 ते 200 रुपयेपर्यंत प्रतिकिलो दर मिळत आहे.

परराज्‍यात होते निर्यात

सातपुड्यातील आमसुल खरेदी स्थानिक व्यापारी तसेच इंदोर, जयपुर व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. धडगाव येथे खरेदी केलेले आमसूल दिल्ली, जयपूर, उत्तरप्रदेश या ठिकाणी निर्यात केले जाते. सातपुड्यातील आमसूलला उत्तर भारतात मोठी मागणी असून आमसूलपासून विविध मसाल्याचे पदार्थ औषधे बनवले जातात. यंदा उशिराने सुरू झालेला आमसूलचा व्यवसाय आणखी 15 ते 20 दिवस सुरू राहणार आहे.

प्रक्रिया उद्योग योजना कागदावरच

सातपुड्यातील आदिवासी बांधवांना आणखी चांगला दर मिळावा; यासाठी गेल्यावर्षी अक्राणीचे आमदार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी आमसूलसाठी प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप कोणताही प्रक्रिया उद्योग अर्थात पावडर बनवण्याचा कारखाना तयार झालेला नाही. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती देऊन लवकर प्रक्रिया उद्योग उभारावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com