नंदुरबार : कोणतीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसताना नंदुरबार शहरात क्लिनिक सुरू करून रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरचा भंडाफोड झाला असून त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime against bogus doctor in Nandurbar hospital had been open for many years)
नंदुरबार (Nandurbar) शहरातील साक्री नाका परिसरातील जुन्या पाणीच्या टाकीच्या परिसरात मराफरी (ता. सिंबादीन, जि. बोकारो, झारखंड) येथील रहिवासी प्रदीप तवन विश्वास हा गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करीत होता. तो रुग्णांवर ॲलिओपॅथी उपचार करून त्यांना ॲलिओपॅथीची औषधे देत होता. त्याच्याबाबत माहिती मिळाल्यावर नंदुरबार पंचायत समितीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जाफर रशिद तडवी यांनी त्यांच्या दवाखान्यात (Hospital) भेट देऊन तपासणी केली असता प्रदीप तवन विश्वास याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणाचे अथवा पदवीचे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.
बिनधास्त दवाखाना सुरू
त्याने शक्ती क्लिनिक नावाने बिनधास्त दवाखाना सुरू करून रुग्णांवर औषधोपचार सुरू केले होते. त्याच्या दवाखान्यात ॲलिओपॅथीची औषधे आढळून आली. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. तडवी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रदीप तवन विश्वास याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.