महाराष्ट्र

..अन् आईची भेट ठरली शेवटची

..अन् आईची भेट ठरली शेवटची

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी धुळ्यात गेलेल्या वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील तरुणाच्या दुचाकीला मोहाडीजवळ वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. आज पहाटे तो धुळ्याहून आईला भेटण्यासाठी व रेशनवर आलेले धान्य घेण्यासाठी वरखेडेत आला होता. मात्र, त्याची ही भेट शेवटची ठरली. (jalgaon-news-warkhede-young-boy-death-accident-in-mother-visit)

वरखेडे येथील विजय बळीराम शिरसाठ (वय ३५) हा तरुण धुळे येथे पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह राहत होता. वरखेडे येथे घरी वयोवृद्ध आई एकटी राहत होती. आईला भेटण्यासाठी व रेशनवर आलेले गहू, तांदूळ घेण्यासाठी शनिवारी (ता. १८) सकाळी सातला तो वरखेडे येथे गावी आला. आईची भेट घेतली व रेशनवरील गहू, तांदूळ घेऊन तो सकाळी दहाला दुचाकीने धुळ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाला. जाताना आईची ही शेवटची भेट असेल, असे स्वप्नातही वाटले नसेल. काही वेळातच त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. धुळे मोहाडीजवळ काळाने घात केला आणि अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने विजयचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा त्याच्यावर वरखेडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंब उघड्यावर

मृत विजय शिरसाठ याची घरची परिस्थिती हालाखीची होती. धुळ्यात तो काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकत होता. मात्र, अपघाती मृत्यूने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. सकाळी धुळ्याहून जाताना पत्नीला पतीचे आणि त्यानंतर वरखेडेहून जाताना आईला मुलाचे शेवटचे दर्शन होईल, अशी दुर्देवी वेळ येईल, असे वाटले नव्हते. मात्र, नियतीने या गरीब कुटुंबावर काळाचा घाव घातला. काही तासांपूर्वी भेटलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच हंबरडा फोडला. मृत विजयच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. या घटनेने वरखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT