पुढल्‍या वर्षी लवकर या..बाप्‍पाला भावपुर्ण निरोप

पुढल्‍या वर्षी लवकर या..बाप्‍पाला भावपुर्ण निरोप
पुढल्‍या वर्षी लवकर या..बाप्‍पाला भावपुर्ण निरोप

जळगाव : गणरायाला निरोप देण्याचा आज दिवस असून सकाळपासूनच गणेशाच्या विसर्जनाला जळगावातील मेहरूण तलावावर सुरवात झाली. 'गणपती बाप्पा मोरया..पुढल्या वर्षी लवकर या..' असे म्हणत निरोप देण्यात आला. (jalgaon-news-anat-chaturdashi-ganesh-visraj-mehrun-dam)

आज गणेश विसर्जन असून कोरोनाचे सर्व नियम पाळून जळगाव शहरात विसर्जनाला सकाळपासूनच सुरवात झाली. शहरातील लहान मोठ्या मंडलासह घराघरातील गणरायांचे विसर्जन हे शहरातील मेहरूण तलावावर होत आहे. याठिकाणी विसर्जनाची पूर्ण तयारी करण्यात अली असून विसर्जनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लहान मंडळाच्या गणेश विसर्जनला सूरवात झाली असुन मोठ्या मंडळाचे गणपती देखील या ठिकाणी विसर्जित केले जाणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षी लवकर या ..' असा गणपतीचा जयजयकार करत गणपती बाप्पाला निरोप देत आहे.

चोख बंदोबस्त

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस तसेच होमगार्ड व रॅपिड ऍक्शन फोर्स मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच शहरातील काही मार्ग बदलण्यात आलेले आहे. नागरिकांनी शांततेत विसर्जन करावं असे आव्हान जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केले आहे.

पुढल्‍या वर्षी लवकर या..बाप्‍पाला भावपुर्ण निरोप
प्रथम मानाचा व नवसाचा श्री दादा गणपती मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने विसर्जन संपन्न

तुरटीच्‍या गणपतीबाबत तक्रार

काही पर्यावरणवादी यांनी तुरटीचे गणपतीमुळे तलावातील काही जीव जंतू आहेत; त्यांना हानी होऊ शकते अशी तक्रार केलेली आहे. जिल्हाधिकारी यांनी प्रदूषण मंडळाकडे याची माहिती मागविली आहे. तरीही महापालिकेच्यावतीने काही कृती अवधूत बनवले जातील त्यामध्ये तुरटीच्‍या गणपतीचे विसर्जन करण्यात येते असे जळगावचेचे आयुक्त यांनी सांगितले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com