NMU Saam tv
महाराष्ट्र

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन होणार

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन होणार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या यंदाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन बहुपर्यायी पद्धतीने होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्‍वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (jalgaon news university summer exams will be offline)

विद्यापीठाचे (University) सातवे कुलगुरू म्हणून प्रा. माहेश्‍वरी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती देताना ते म्हणाले, की गेल्या दोन वर्षापासून कोविडच्या (Corona) महामारीमुळे विद्यापीठाच्या सर्व परिक्षा (Exam) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत होत्या. मात्र सद्यःस्थितीत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे विद्यापीठाच्या परिक्षा आता ऑफलाइन घेण्याचा निर्णय आज झालेल्या परिक्षा मंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे.

निगेटीव्‍ह मार्किंग पद्धती

विद्यापीठाद्वारे उन्‍हाळी २०२२ च्या लेखी परिक्षा मे मध्ये घेण्यात येतील. त्या बहुपर्यायी स्वरूपात ऑफलाइन पद्धतीने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परिक्षा केंद्रावर घेण्यात येतील. पदवीस्तरावर ६० गुणांची परिक्षा ९० मिनिटांची असेल, प्रत्येक प्रश्‍नाला एक गुण राहील व सर्व प्रश्‍न सोडविणे अनिवार्य असेल. या परिक्षेकरीता निगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू राहणार नाही. पदव्युत्तर स्तरावर ६० गुणांची परिक्षा १२० मिनिटांची असेल. प्रत्येक प्रश्‍नाला एक गुण राहील व सर्व प्रश्‍न सोडविणे अनिवार्य असेल. या परिक्षेकरीता निगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू राहणार नाही. बहिःस्थ अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील परीक्षा १०० गुणांची व १२० मिनिटांची असे, एकूण ५० प्रश्‍न असतील. प्रत्येक प्रश्‍नाला दोन गुण राहतील. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दीर्घोत्तरी ऑफलाइन घेण्यात येतील. प्रत्याक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे प्रचलीत पद्धतीने ऑफलाइन करण्यात येईल. अंतर्गत परीक्षा या देखील प्रचलीत पद्धतीने शक्यतो दीर्घोत्तरी घेण्यात येतील. पुढील वर्षाच्या म्हणजे २०२२-२३ मधील हिवाळी व उन्हाळी परीक्षा या पूर्वीच्या प्रचलीत पद्धतीने दीर्घोत्तरी घेण्यात येतील.

विद्यार्थी, कर्मचाऱ्यांशी साधणार संवाद

प्रा. माहेश्‍वरी म्हणाले, की विद्यापीठातील हे वाद टाळण्यासाठी आपण संवादात्मक प्रक्रिया सुरू करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन चालणार असून यात कोणत्याही प्रकारचे राजकारण येणार नाही, हाच प्रयत्न असेल. शिवाय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दुपारच्या सत्रात त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. के.एफ. पवार, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, विद्यापीठ कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील उपस्थित होते.

सौर ऊर्जा प्रकल्पास निधी मंजूर

विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापीत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने तीन कोटी ६६ लाख ७१ हजार ९६० रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प साकारण्यात येणार असून यामुळे विद्यापीठाला सुमारे दोन हजार किलो वॅटचा मंजूर आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यावर किमान एक तृतीयांश विजेची बचत होणार आहे. दरम्यान, विद्यापीठातर्फे ‘लॅब टू लँड’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेबाबत सांगताना कुलगुरू प्रा. माहेश्‍वरी म्हणाले, विद्यापीठातर्फे प्रयोग शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन माहिती देण्याचा उपक्रम सुरूच राहील, असेही स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT