Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: विजयी उमेदवारांवर पराभूत विरोधकांकडुन दगडफेक, भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू; जामनेर तालुक्‍यातील घटना

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर (Jamner) तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्‍यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकत्‍र्याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

राज्‍यासह जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने (BJP) विजय मिळविला आहे. यात जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. या दरम्‍यान जामनेर तालुक्‍यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या- केल्याच त्यांच्‍यावर पराभुत झालेल्या विरोधकांकडुन तुफान दगडफेक करण्यात आली. पोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

टाकळी ग्रामपचायतीच्‍या निकालानंतर दोन गट भिडले असून काही जणांनी दगडफेक केली. यामुळे गावात दंगलीसारखी परिस्‍थती निर्माण झाली होती. या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज श्रीराम माळी (वय ३२) या भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्‍याची माहिती आहे. घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

Freedom At Midnight Cast Unveiled : निखिल अडवाणी यांच्या 'फ्रिडम ॲट मिडनाइट'चा फर्स्ट लूक आऊट; गांधी- नेहरू आणि पटेल यांच्या भूमिकेत कोण दिसणार ?

Covaxin : कोव्हिशिल्डनंतर आता कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

SCROLL FOR NEXT