Beed News: मुंडे बंधू– भगिनीचे एकत्र पॅनल; नाथरा ग्रामपंचायतीवर विजय

मुंडे बंधू– भगिनीचे एकत्र पॅनल; नाथरा ग्रामपंचायतीवर विजय
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे परळी तालुक्यातील मूळगाव असणाऱ्या नाथरा गावात, सरपंच पदाचे उमेदवार अभय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजया संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मी आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित बसून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र (NCP) राष्ट्रवादीमधील काही लोकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक लागली. या अगोदर विजय झाला होता, असा देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. (Maharashtra News)

Beed News
Gram Panchayat Result: गुजरात भाजप प्रदेशाध्‍यक्षांच्‍या कन्‍येचा विजय; मात्र गिरीश महाजनांना जामनेरात धक्‍का

नाथरा ग्रामपंचायत ही मी आणि धनंजय मुंडे (Dhananjay Mumde) यांनी मिळून बिनविरोध काढली होती. गावच्या लोकांची इच्छा अशी होती, की ग्रामपंचायत (Gram Panchayat) बिनविरोध निघाली पाहिजे. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला. उपसरपंच आमचा राहील आणि सरपंच राष्ट्रवादीचा राहील; असा निर्णय झाला होता. मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनीच ऐकले नाही. म्हणून निवडणूक लागली. या निवडणुकीत विजय अगोदरच झाला होता. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

६४८ मतांनी विजय

नाथरा गावामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे एकाच बॅनरवर फोटो होते. त्यामुळे या दोघांचा उमेदवार असलेला अजय मुंडे याचा 648 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा सरपंच तर भाजपाचा उपसरपंच होणार आहे. अशी मुंडे बहीण भावांनी वाटाघाटी करून ही निवडणूक लढवली असल्याने राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com