Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: निंबादेवी धरणात दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू; गुरांना पाणी पाजण्यासाठी गेले असताना घडली घटना

निंबादेवी धरणात दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू; गुरांना पाणी पाजण्यासाठी गेले असताना घडली घटना

साम टिव्ही ब्युरो

दहिगाव (यावल) : सातपुडा पर्वताच्या लगत असलेल्‍या निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मंगळवारी (३० मे) सायंकाळी (Yawal) ही घटना घडली. (Tajya Batmya)

नायगाव (ता. यावल) शिवारातील निमछाव गावठाण भागात रहिवास असलेल्या आदिवासी पाडा वस्तीतील आसाराम शांतीलाल बारेला (वय १५) व निमा किसन बारेला (वय १०) हे दोघं म्हशीला पाणी पाजण्यासाठी निंबादेवी धरणामध्ये उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने म्हशीच्या मागोमाग दोघं बालके गेले. त्यातच एकाचा पाय घसरला. त्याला पकडायला दुसरा गेला असता दुसराही बुडून त्यात मयत झाला. रात्री मुलाचा मृतदेह काढण्यात आला होता. तर आज (३१ मे) सकाळी साडेदहाच्या दरम्यान मुलीचा मृतदेह आदिवासी (Aadivasi) बांधवांनी काढला. दरम्यानच्या काळात कोणीही शासकीय अधिकारी तिथे फिरकले नसल्‍याचे आदिवासी बांधवा सांगत आहेत.

पहिल्‍यांदाच गेले अन्‌..

आसाराम हा इयत्ता नववीमध्ये वाघजिरा आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. तर निमा किसन बारेला ही निमच्या गावठाण येथे असलेल्या प्राथमिक शाळेतच चौथीमध्ये शिक्षण घेत होती. दोघांची परिस्थिती गरिबीची आहे. मुळात निमछाव या गावठाण भागात गुरांना पाणी पाजण्यासाठी कुंड तयार केले आहे. त्यात पाणी सोडले जात नाही. दोन्‍ही मुले एक दिवसासाठी धरणावर पाणी पाजण्यासाठी गेले आणि तिथेच दुर्घटना घडली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल संजय देवरे, होमगार्ड जनार्दन महाजन यांनी घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

Maharashtra Politics : भाजपला मोठा झटका बसणार? अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Honeymoon Destinations in India: लोणावळा खंडाळा... कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडरचा खात्मा

Kiwi Benefits During Periods: पिरियड्स दरम्यान किवी खाल्ल्याने शरिराला कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT