Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याने जीवे मारण्याची धमकी; एक लाख घेत फसवणूक

Jalgaon News : एक लाख रुपये दिल्याचा काही पुरावा रहावा या अनुषंगाने धनराज याने अनिल यांना एक लाख रुपये घेतल्याचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते. यासाठी काही कालावधी ठरविण्यात आला होता

Rajesh Sonwane

जळगाव : गंभीर आजार असल्याने उपचारासाठी पैसे लागत असल्याने उसनवारीने एकजणांकडून १ लाख रूपये घेतले. मात्र हि रक्कम परत न करता एका ४४ वर्षीय व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. तर पैसे परत मागितल्यानंतर ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अनिल अर्जून महाले (वय ४४) यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान आहे. हे दुकान चालवूनच ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान त्यांच्या ओळखीतला शहरातीलच ज्ञानदेव नगरातील धनराज आत्माराम पवार (वय ३३) याने १८ ऑक्टोबर २०२१ ला आपल्याला गंभीर आजार असल्याचे सांगून अनिल महाले यांच्याकडून १ लाख रूपये उसनवारीने घेतले. 

स्टॅम्प पेपरही दिला लिहून 

दरम्यान एक लाख रुपये दिल्याचा काही पुरावा रहावा या अनुषंगाने धनराज याने अनिल यांना एक लाख रुपये घेतल्याचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते. यासाठी काही कालावधी ठरविण्यात आला होता. दरम्यान अनिल यांनी धनराज याच्याकडे उसनवारीने दिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र धनराज यांच्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. असा प्रकार वारंवार घडत होता. 

पैसे मागितल्याने जीवे मारण्याची धमकी 

दरम्यान अनिल महाले यांनी वेळोवेळी पैसे मागितले असता देत नव्हते. दरम्यान एक दिवशी पैसे मागत असल्याने अनिल यांना धनराज पवार यांनी ठार मारण्याची धमकी देऊन फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर अनिल महाले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २८ जानेवारीला दुपारी दोनला संशयित धनराज पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र उगले तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT