Jalgaon Pachora Railway Line Saam tv
महाराष्ट्र

जळगाव-पाचोरा दरम्यान तिसरी रेल्वे लाइन सुरू

जळगाव-पाचोरा दरम्यान तिसरी रेल्वे लाइन सुरू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव-पाचोरा ही ४८ किमी लांबीची तिसरी लाईन डिझेल इंजिनसह ट्रेन चालविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या नव्याने बांधलेल्या (Jalgaon) तिसऱ्या मार्गावर डिझेल इंजिनसह ७ डब्यांच्या ट्रेनची ट्रायल रन १२० किलोमिटर प्रतितास वेगाने घेण्यात आली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) विभाग सध्या ९० किलोमिटर प्रतितास वेगाने रेल्वेगाड्या चालवित आहे. नंतर ११० किलोमिटर प्रतितासापर्यंत वाढविण्यात येणार आहे. (Jalgaon Pachora Third Railway Line)

सुरक्षा तपासणी आणि अधिकृततेसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा (मुंबई मुख्यालय) आणि इतर अधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून जळगाव ते पाचोरा (Pachora) दरम्यान रेल्वे मार्गाच्या विविध टप्याची पाहणी केली होती. जळगाव ते पाचोरा दरम्यानच्या या ४८ किमी लांबीच्या नवीन मार्गामुळे या विभागातील रेल्वे (Railway) मार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. जळगाव ते (Bhusawal) भुसावळ तिसरी लाईन या आधीच रेल्वे चालवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे आता भुसावळ ते पाचोरा हा भाग रेल्वेच्या कामकाजासाठी तिसरा मार्ग आहे. लोहमार्गाचे काम अनेक ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. या तिसऱ्या लोहमार्गाच्या झालेल्या कामाचे परिक्षण करण्यासाठी मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या पथकाने गुरूवारपासून भुसावळ ते माहेजी दरम्यान ६ विशेष मोटर ट्रॉलीव्दारे परिक्षण करण्यास सुरवात केली होती. पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव तसेच म्हसावद माहेजी दरम्यानच्या प्रत्येकी एक-एक किलोमिटर दरम्यान तसेच नदी-नाले पुलांचे देखील निरीक्षण करण्यात येऊन सूचना देण्यात आल्या. यावेळी मुंबई, भुसावळ मंडळासह रेल्वे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सर्वच गाड्यांचा वेग वाढणार

भुसावळ ते मनमाड तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. हा मोठा प्रकल्प आहे. यामुळे रेल्वेला चारही ट्रॅकवर गाड्या चालवून प्रवासी व मालवाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळविण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात भुसावळ ते मनमाड हा तिसरा रेल्वे मार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. भुसावळ ते जळगाव तिसरी रेल्वे लाईन पूर्ण झाली आहे. आता जळगाव ते पाचोरा दरम्यान काम सुरू होते. तेही आता पूर्ण झाले आहे. याची तपासणी करून मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री करण्यासाठी मुंबई, भुसावळचे वरिष्ठ अधिकारी आले होते. यामुळे आता भुसावळ ते पाचोरा दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग झाल्याने गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT