Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वडीलानंतर एकूलत्‍या एक मुलानेही संपविले जीवन; पाच वर्षाच्‍या अंतरात कुटूंबाचा आधार गेला

वडीलानंतर एकूलत्‍या एक मुलानेही संपविले जीवन; पाच वर्षाच्‍या अंतरात कुटूंबाचा आधार गेला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याने घरामध्ये गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. सदर घटना बुधवारी (Jalgaon) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास देव्हारी (ता. जळगाव) या गावात उघडकीस आली. अमोल अरूण वाघ (२४) असे मृत शेतकऱ्याचे (Farmer) नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

देव्हारी (ता. जळगाव) येथे अमोल वाघ हा तरूण शेतकरी आजोबा सोनाजी वाघ, आई कल्पनाबाई यांच्यासह वास्तव्यास होता. शेती असल्‍याने शेतीसाठी सोसायटीचे कर्ज घेतले होते. मात्र, अपेक्षीत उत्पन्न नसल्यामुळे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत अमोल होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी आजोबा आणि आई घराबाहेर बसले असताना अमोलने घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आजोबा, आई घरात आल्यानंतर अमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने अमोलचा मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात आणले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

वडीलांनी देखील केली होती आत्महत्या

अमोल घरात एकूलता एक मुलगा होता. पाच वर्षांपूर्वी वडील अरूण वाघ यांनी देखील पेटवून घेवून आत्महत्या केली होती. त्यामुळे आई व आजोबांची जबाबदारी अमोलवरच होती. मात्र अमोलने उचललेल्‍या या पावलामुळे दोन्‍हींचा आधार गेला आहे. यामुळे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT