Badalapur News: एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी; ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी चोरली वीज

एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी; ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी चोरली वीज
Mahavitaran Electricity Theft
Mahavitaran Electricity TheftSaam tv
Published On

बदलापूर : बदलापूर पश्चिमेत महावितरणने एका दिवसात तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केला. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी चोरीच्या विजेचा वापर करणाऱ्या कारव ग्रामपंचायतीचाही (Gram Panchayat) समावेश आहे. याशिवाय बाटलीबंद पाणी तसेच जीन्स वाशिंग कारखान्यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वीजचोरी (Electricity Theft) पथकाने उघडकी आणली आहे. (Maharashtra News)

Mahavitaran Electricity Theft
Nashik News: साखर झोपेत मृत्‍यूने गाठले; लाकडी कपाट पडल्‍याने चिमुकल्‍याचा मृत्‍यू

महावितरणच्या (Mahavitaran) कल्याण मंडळातील उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ एप्रिलला बदलापूर पश्चिमेतील काराव परिसरात तपासणी मोहिम राबवली. यात काराव ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी मीटर टाळून थेट आकडा टाकत वीजचोरी केल्याचे आढळून आले. अधिक तपासणीत ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २७ लाख ४६ हजार रुपये किंमतीची १ लाख २४ हजार ८४० युनिट वीज चोरल्याचं निष्पन्न झालं. तर याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोरया ब्रेव्हरिज या बाटलीबंद पाण्याच्या कारखान्यात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. या कारखान्याने सुमारे ८६ लाख २८ हजार रुपयांची ३ लाख ९२ हजार २०६ युनिट वीजचोरी केल्याचं उघडकीस आले.

Mahavitaran Electricity Theft
Pimpri Chinchwad Crime: प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने पत्‍नीसोबत केले भयानक कृत्‍य

तिसऱ्या ठिकाणी स्वप्नील शेवाळे याच्या जीन्स वाशिंग व डाईंग कारखान्यात मीटर बायपास करून थेट वीजचोरी सुरू असल्याचे आढळले. याठिकाणी १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची ९ हजार १८ युनिट विजेचा चोरटा वापर समोर आला. या तिन्ही ग्राहकांना चोरीच्या विजेचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून विहित मुदतीच्या आत देयकाचा भरणा न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडळ दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी या कारवाईबाबत महिला अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाचं कौतुक केलं. उपकार्यकारी अभियंता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता नेहा ढोणे, जनमित्र रमेश शिंदे, प्रशिक्षणार्थी प्रथमेश जाधव, चालक सुर्यकांत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com