तापमान 
महाराष्ट्र

जळगावमध्ये राज्यातील निच्चांकी तापमान; सात अंश सेल्सिअस

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. जळगाव शहराच्या किमान तापमानाने मागील पाच वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वात कमी सात अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद मंगळवारी (ता.२१) जळगावमध्ये झाली. (jalgaon-news-The-lowest-temperature-in-the-state-in-Jalgaon)

तापमानात (Temperature) मोठी घट झाल्यामुळे जळगावकरांना (Jalgaon) हुडहुडी भरली असून, याचा परिणाम जनजीवनावर देखील झालेला पहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात अरबी व बंगालच्या महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून तापमान नेहमीपेक्षा कोरडे असून उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे.

आठवडाभर थंडीची लाट

थंडीची लाट आगामी आठवडाभर कायम राहण्याची शक्यता असून पुढील काही दिवस पारा १० अंशांपेक्षा खाली राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

राज्‍यातील अन्‍य ठिकाणचे तापमान

राज्यातील इतर ठिकाणचे नोंदवलेले आजचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे : सोलापूर-१०.८, परभणी-१०, अमरावती-७.७ (Amaravati), चंद्रपूर-९.६, गोंदिया-६.४, नागपूर-७.६,वर्धा-८.२. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून नाशिकचा किमान पारा हळूहळू घसरत चालला होता. १५ डिसेंबरला १५.८ अंश सेल्सिअस तापमान राहिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT