Jalgaon News Eknath Khadse
Jalgaon News Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंना धक्का; राष्‍ट्रवादीत गेलेले भुसावळचे दहा नगरसेवक अपात्र

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्‍या पाठोपाठ भाजप सोडून अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यात भुसावळ नगरपरिषदेच्‍या नगरसेवकांचा देखील समावेश होता. परंतु, पक्षांतर बंदी कायद्यानुसार भुसावळचे (Bhusawal) दहा नगरसेवक १८ डिसेंबर २०२१ पासून ते नगरपरिषदेच्या पुढील कार्यकाळासाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Abhijit Raut) यांनी ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांना धक्का मानला जात आहे. (Jalgaon News Eknath Khadse News)

माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर जिल्ह्यातील त्यांच्या काही समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. १८ डिसेंबर २०२१ ला भुसावळ येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा दौरा झाला होता. त्यावेळी दहा नगरसेवकांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. त्यामुळे पुष्पाबाई रमेशलाल बत्रा यांनी या दहा नगरसेवकांना अपात्र करावे, म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही कडील बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर सोमवारी (ता. १८) भुसावळच्या दहा नगरसेवकांना १८ डिसेंबर २०२१ ते नगरपरिषदेच्या पुढील कार्यकाळापर्यंत अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदारातर्फे ॲड. राजेंद्र राय, तर नगरसेवकांतर्फे ॲड. महेश भोकरीकर, ॲड. हरीश पाटील यांनी काम पाहिले.

अपात्र नगरसेवक

लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, ॲड. बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT