Jalgaon Temperature Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Temperature : जळगाव जिल्हा उन्हाने तापला; जिल्ह्यातील सर्वच शहरातील तापमान ४२ अंशाच्या वर

Jalgaon News : यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार मागील तीन. चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची दाहकता अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याची अनुभूती आतापासून जाणविण्यास सुरवात झाली आहे. (Jalgaon) जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील तापमान (Temperature) आतापासूनच ४२ अंशाच्या वर पोहचले आहे. यामुळे जळगाव जिल्हा उन्हाने तापला असल्याची अनुभूती येण्यास सुरवात झाली आहे.  (Latest marathi news)

यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार मागील तीन. चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात जळगाव शहरासह जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. उन्हाच्या दाहकतेत नागरिक होळपळून (Jalgaon Temperature) निघत असून, नागरिक उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी दुपारच्यावेळी सावलीचा आधार घेत आहेत. अनेकजण आतापासूनच कुलर, ए.सी. बसवत आहेत. याशिवाय शीतपेयांच्या दुकानावर देखील गर्दी होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वच शहरात ४० पार 

जळगाव जिल्ह्यातील १५ तालूक्यातील तापमान हे चार दिवसांपूर्वीच ४० अंशाच्या गेले आहे. दरम्यान दोन दिवसांपासून पॅरा ४२ अंशाच्या वर पोहचले असून जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव, रावेर, यावल शहरातील तापमान ४१ अंशावर होते. तर उर्वरित शहरातील तापमान हे ४२ अंशाच्या वर गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

Shivling: शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात? जाणून घ्या, त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

SCROLL FOR NEXT