Jalgoan Temperature  Saam tv
महाराष्ट्र

जळगावचे तापमान ४० अंशांवर; उन्‍हाच्‍या झळा झाल्‍या तीव्र

जळगावचे तापमान ४० अंशांवर; उन्‍हाच्‍या झळा झाल्‍या तीव्र

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : उन्‍हाळ्याची चाहुल लागली असून मार्चच्‍या मध्‍यांतरातच जळगावचे तापमान ४० अंशावर पोहचले आहे. रात्री व सकाळी हवेत गारवा असला तरी दुपारच्‍या तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. आजचे कमाल (Temperature) तापमान ३९ अंशाच्‍यावर नोंदविले गेले. (jalgaon news temperature at 40 degrees Intense heat)

जळगाव (Jalgaon) शहरासह जिल्ह्यात सोमवारी ३८ अंश तापमान होते. तर आजच्‍या तापमानात १ अंशाने वाढ झाली असल्‍याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी डोक्यावर टोपी, हातात रुमाल, महिलांनी स्कार्फ, सनकोटचा वापर सुरू केला आहे. बाजारपेठेत ग्रीननेट किंवा ताडपत्री टाकून उन्हापासून संरक्षण केले जात आहे. दुपारनंतर उन्हाच्या (Summer) झळांनी नागरिक आतापासूनच हैराण होत असल्‍याचे दिसून येत आहे.

यंदा तापमानात वाढ

उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मैदानी राज्यांमध्ये उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोबतच सौराष्ट्र, कच्छमध्ये वाढलेले तापमान आणि उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात तापमान वाढत आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली. आपल्याकडे तापमान एप्रिल, मेमध्ये ४० अंशांवर जाते. यंदा प्रथमच ते मार्चमध्ये ४० ते ४४ अंश असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT