उपमहापौर पदाचे नाराजीनाट्य; अखेर अनिल नागमोतींच्‍या गळ्यात पडली माळ

उपमहापौर पदाचे नाराजीनाट्य; अखेर अनिल नागमोतींच्‍या गळ्यात पडली माळ
Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv
Published On

धुळे : धुळे महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी दर सहा महिन्यानंतर नवीन उपमहापौर देण्याचा निश्चय पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आला होता. त्‍यानुसार आज उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे. या निवड प्रक्रिया दरम्यान अनिल नागमोती (Anil Nagmoti) यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पक्षातर्फे टाकण्यात आली आहे. (dhule corporation post of Deputy Mayor Finally on Anil Nagmoti's neck)

धुळे महापालिकेच्‍या (Dhule Corporation) उपमहापौर पदासाठी दोन उमेदवारी अर्ज भाजप (BJP) पक्षाकडून दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भोवया उंचावल्या होत्या. यानिमित्ताने भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु ऐनवेळी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानत उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे नागसेन चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अनिल नागमोती यांचा उपमहापौर पदाचा एकमेव अर्ज दाखल असल्यामुळे त्यांचा उपमहापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर अनिल नागमोती यांना उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले.

Dhule Corporation
केळीला फळाचा दर्जा; रावेरला काढली केळी घडाची मिरवणूक

बोरसेंना मोठी जबाबदारी?

उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेले नाराज भाजपचे नगरसेवक नागसेन बोरसे यांना देखील पुढील काळात मोठी जबाबदारी देण्यासाठीचे पक्षश्रेष्ठींनीतर्फे सांगण्यात आले असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com