Suicide Case PUBG Game Saam tv
महाराष्ट्र

पब्‍जी गेमसाठी तरूणाची आत्‍महत्‍या; रिचार्ज करून न दिल्‍याने टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मोबाईलवर पब्‍जी गेम खेळताना त्‍यात शेवटच्‍या लेव्‍हलपर्यंत जात अनेकांनी आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. परंतु, हा गेम खेळताना मोबाईलमधील इंटरनेट डाटा संपला. यानंतर वडीलांनी रिचार्ज करून न दिल्‍याने एका तरूणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बोदवड येथे घडली. (jalgaon news Suicide of a youth for a pubg game)

बोदवड (Bodwad) शहरातील दत्त कॉलनीमधील रहिवासी सुरेश सखाराम माळी (वय ५१) यांचा मुलगा अजय माळी याला मोबाईलवर पब्जी (PUBG) खेळण्याची आवड होती. यासाठी सुरेश माळी यांनी त्याला नुकताच स्मार्टफोन घेऊन दिला होता. मात्र त्यातील डाटा लागलीच संपल्याने त्याने वडिलांकडे रिचार्जसाठी आग्रह केला. यावेळी वडिलांनी त्याला थांबण्याचे सांगितले असता अजय हा घरातून निघून गेला होता. यानंतर अजयच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळला नाही. त्यामुळे या संदर्भात बोदवड (Police) पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती.

अन्‌ विहिरीत आढळला मृतदेह

दरम्यान १२ जुलैल शहरातील रूपनगरामधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये खाटीक समाज मंदिराजवळील विहिरीत अजय याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सुरेश माळी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT