suicide case 
महाराष्ट्र

स्वयंपाक करताना वरच्या खोलीत गेली ती परत आलीच नाही; मुलीने पाहताच फोडला टाहो

स्वयंपाक करताना वरच्या खोलीत गेली ती परत आलीच नाही; मुलीने पाहताच फोडला टाहो

Rajesh Sonwane

पहूर (जळगाव) : जामनेर (Jamner) तालुक्यातील पहूर येथे ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली. संतापाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल उचल्‍याचे बोलले जात आहे. मात्र महिलेच्‍या माहेरच्‍यांनी पतीवर आरोप केला आहे. (jalgaon-news-suicide-case-women-cooking-went-upstairs-while-and-suicide)

पहूर पेठ अंतर्गत असलेल्या संतोषीमाता नगरात राहणाऱ्या प्रिया राजेंद्र नवघरे (वय ३५) या विवाहितेने राहत्या घराच्या वरील मजल्यावर साडीचा गळफास तयार करून संतापाच्या भरात जीवनयात्रा संपविली. स्वयंपाक सुरु असताना वरच्या खोलीत जावून आतील कडी लावली व त्‍यांनी गळफास घेतला.

आई का आली नाही म्‍हणून मुलगी गेली वर

प्रिया नवघरे या नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची तयारी करत होत्या. काही कामासाठी त्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत गेल्या. मात्र दहा- पंधरा मिनिटे होऊनही आई खाली का येत नाही? हे पाहण्यासाठी मुलगी वैष्णवी वरच्या खोलीकडे गेली. मात्र घराचा दरवाजा व खिडकी आतून बंद असल्याने तिने आजी कुसुमबाई नवघरे यांना आवाज दिला. आजी कुसुमबाई आणि वैष्णवी यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कडी लावलेली असल्याने त्यांना दरवाजा उघडता येत नव्हता. त्यांच्या या आवाजाने पती राजेंद्र नवघरे वर आले. त्यांनीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात शेजारील प्रशांत विठ्ठल कुमावत यांनी धाव घेऊन दरवाजा जोरात ढकलल्याने आतील कडी उघडल्या गेली.

वैष्णवीचा टाहो

आत प्रवेश करताच प्रिया ही साडीचा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. हे दृष्य पाहताच सर्वांना एकच धक्का बसला. आईची ही स्थिती पाहून वैष्णवीने टाहोच फोडला. आजूबाजूचे लोक मदतीसाठी एकत्र आले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत घटनास्थळी दाखल झाले. ताबडतोब प्रिया यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रिया यांच्या पश्चात पती, मुलगी वैष्णवी (वय १४ ), दोन मुले पियुष (वय ११) आणि साई (वय ९) सासू -सासरे असा परिवार आहे.

माहेरच्या नातेवाईकांचा आरोप

अंत्यसंस्कारासाठी आलेल्या माहेरच्या नातेवाईकांनी पती राजेंद्र नवघरे यांच्यावर मुलीच्या आत्महत्येस जबाबदार धरत आरोप केले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्मशानभूमीत दाखल झाले. पोलीसांच्या उपस्थितीत सायंकाळी सहाला अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT