suicide 
महाराष्ट्र

‘मिस यु बेटा’चे स्‍टेटस ठेवत आत्‍महत्‍या; सासू– सासऱ्याच्‍या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल

‘मिस यु बेटा’चे स्‍टेटस ठेवत आत्‍महत्‍या; सासू– सासऱ्याच्‍या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल

Rajesh Sonwane

जळगाव : शिरसोली येथील तरुणाने सासू- सासऱ्यांच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज (२८ नोव्हेंबर) सकाळी साडेसहाला उघडकीस आली. आत्‍महत्‍येपुर्वी मोबाईलवर ‘मिस यु बेटा’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आत्महत्या केली.

शिरसोली येथील अशोकनगर परिसरातील अमोल प्रकाश धनगर (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. बकरी चारत असल्‍याने तो गावातील बकऱ्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री झोपायला जायाचा. मात्र शनिवारी रात्री त्याने वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले व तो घरीच झोपला. अमोलची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.

वडील घरी आल्‍यानंतर घटना उघडकीस

आज सकाळी साडेसहाला वडील घरी आले असता त्यांना अमोल हा छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्‍याच्‍या अवस्‍थेत आढळून आला. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्‍याने परिसरातील नागरीक धावले. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgoan Medical collage) दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. अमोल त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी, पत्नी, वडील, भाऊ आहे.

व्‍हॉटस्‌ॲप स्‍टेटस्‌ व सुसाईड नोटवर सारखाच मजकूर

अमोलने व्‍हॉटस्‌ॲप स्‍टेटस्‌ व सुसाईड नोटवर सारखाच मजकूर लिहिला आहे. यात आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. कारण माझी सासूबाई आणि सासरा रा. रत्नपिंप्रीचे आहे. ते मला फार त्रास देतात आणि फोनवरती धमकीपण देतात. म्हणून मी माझी जिवन यात्रा संपवत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करा, ही नम्र विनंती. माझा बकरीचा व्यवसाय आहे. त्या बकऱ्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे. जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा आहे. आय मिस यु बेटा.

खिशात सुसाईट नोट

अमोल याने आत्‍महत्‍या करण्यापुर्वी सुसाईट नोट लिहिली. हि सुसाईड नोट अमोलच्‍या खिशात आढळून आली. यात त्याने सासू सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून जीवनयात्रा संपवत असल्‍याचा उल्‍लेख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT