suicide 
महाराष्ट्र

मध्‍यरात्रीनंतर कामावरून घरी आला..त्याने बाहेरून कडी लावली अन्‌ संपविली जीवनयात्रा

मध्‍यरात्रीनंतर कामावरून घरी आला..त्याने घराला बाहेरून कडी लावली अन्‌ संपविली जीवनयात्रा

साम टिव्ही ब्युरो

पहूर (जळगाव) : शेतात रोटोव्‍हेटरचे काम संपवून मध्‍यरात्रीनंतर दोनच्‍या सुमारास घरी आला. थोडा वेळ थांबल्‍यानंतर घरातून बाहेर पडत दाराला कडी लावली. यानंतर घरासमोरच त्‍याने जीवनयात्रा संपविली. पहूर (ता. जामनेर) येथील २७ वर्षीय तरुणाने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (९ डिसेंबर) पहाटे सुमारास उघडकीस आली. (jalgaon-news-suicide-case-He-came-home-from-work-after-midnight-and-suicide)

जामनेर- पाचोरा (Pachora) मार्गावर पहूर येथील लेलेनगर भागात राहणाऱ्या नारायण त्र्यंबक उबाळे (वय २७) या तरुणाने घरासमोरच असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीचा गळफास लावून जीवनयात्रा संपवली. मयत नारायण उबाळे गॅरेज व्यवसायासह ट्रॅक्टर रोटावेटर चालविण्याचे काम करीत होते. बुधवारी रात्री ते ट्रॅक्टर रोटावेटरच्या कामासाठी दुसऱ्याच्या शेतावर गेले होते. शेतातील काम आटोपून रात्री दोन वाजेच्या सुमारास ते घरी आले.

पहाटे वहिनी उठली अन्‌ पाहून झाला आक्रोश

सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना नारायण उबाळे यांनी घराच्या बाहेर येऊन दाराला बाहेरून कडी लावली आणि समोरच असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने गळफास तयार करून आत्महत्या केली. नेहमी प्रमाणे मयत नारायण उबाळे यांची वहिनी भावना गजानन उबाळे सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उठली असता त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दाराला बाहेरून कडी लावलेली असल्याने त्यांनी दरवाजा जोरात ठोठावला. त्यांच्या या प्रयत्नात दरवाजाला बाहेरून असलेली कडी उघडली गेली. त्यांनी बाहेर येउन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. गळफास घेतलेल्या अवस्थेत दिराला पाहून त्यांनी त्यांच्या सासू- सासर्‍यांना आवाज दिला. झोपेतून खडबडून जागे होताच त्यांच्यासमोर पोटच्या गोळ्याने गळफास लावल्‍याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

काही दिवसांपुर्वी त्‍याचा घटस्‍फोट

मयत नारायण उबाळे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच मयत नारायण उबाळे यांचा घटस्फोट झाला होता. त्यांच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT