Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने संपविले जीवन; खोलीतच घेतला गळफास

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : बीड येथून जळगावात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. (Jalgaon) रायसोनी इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्याने खोलीतच गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथम सत्रातील दोन विषय राहिले असल्याची माहिती समोर आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (Latest Marathi News)

बीड (Beed) येथील विश्वंभर रत्नाकर खडके (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे (Student) नाव आहे. विश्वंभर खडके हा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन विद्या शाखेच्या प्रथम वर्षाला होता. त्याचे गेल्या सत्रात दोन विषय राहिले होते. दरम्यान २६ फेब्रुवारीला महाविद्यालय संपल्यावर तो वसतिगृहातील वास्तव्यास असलेल्या खोली क्रमांक ४९ मध्ये गेला. त्याचे रूम पार्टनर आणि इतर मित्र नेहमीप्रमाणे सायंकाळी खोलीच्या बाहेर आले. यानंतर तो एकटाच होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खोलीतून सर्व गेल्यावर घेतला गळफास 

खोलीत कोणीही नसताना विश्वंभर याने छताला दोरी बांधत गळफास लावत आत्महत्या केली. त्याच्या खोलीत सोबत राहणारा शिवमसिंह राजपूत हा खोलीत आला. यावेळी दार आतून बंद होते. त्याने धक्का मारून दार उघडले असता त्याला विश्वंभर छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे पाहून घाबरलेल्याने आरडाओरड केला. यानंतर शेजारील खोल्यांतून इतर विद्यार्थी धावत तिथे पोचले. तत्काळ त्यांनी होस्टेल रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिली. एमआयडीसी (Police) पोलिस ठाण्याला माहिती मिळताच त्यांनी महाविद्यालयाच्या वसतिगृहात येऊन विश्वंभरचा मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT