Dhangar Reservation: धनगर आरक्षणाचे वादळ राजधानीत धडकणार; १००० गाड्यांचा ताफा घेऊन धनगर बांधव मुंबईकडे रवाना

Dhangar Reservation: अंबाजोगाईतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकास अभिवादन करून यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले 1 हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

Dhangar Reservation:

एकीकडे राज्यात मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच तापल्याचे दिसत आहे. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांचा लढा तीव्र होत असतानाच राज्यातील धनगर बांधवही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

धनगर आरक्षणाची ( Dhanagar Reservation) अंमलबजावणी करण्याच्या मागणी करिता धनगर समाज बांधव आक्रमक झाला आहे. बीडच्या अंबाजोगाई इथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे हजारोंच्या संख्येने समाज बांधव कुच करत आहेत. अंबाजोगाईतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकास अभिवादन करून यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले 1 हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही भूमिका धनगर समाज बांधवांनी केली आहे. सरकार केवळ धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप देखील यावेळी धनगर बांधवांकडून करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Nandurbar News : धक्कादायक..रुग्णवाहिका बंद पडल्याने गाडीतच प्रसूती; प्रकृती खालावल्याने महिलेचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच धनगर आणि धनगड एकच नाहीत हे देखील न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्यातील आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिलेला धनगर समाज यामुळे वंचितच राहणार आहे. (Latest Marathi News)

Beed News
Manoj Jaranage Patil : एसआयटी चौकशीच्या आदेशानंतर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला सर्वात जास्त फोन...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com